विशेष प्रतिनिधी
पुणे : हमीद दलवाई यांनी २२ मार्च १९७० रोजी स्थापन केलेल्या मुस्लीम सत्यशोधक मंडळाला ५२ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने एका विशेष समारंभाचे आयोजन केले आहे. २२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता एस. एम. जोशी सभागृहात हा कार्यक्रम होईल. Awards Ceremony by Muslim Satyashodhak Mandal
प्रमुख उपस्थिती डॉ. बाबा आढाव यांची आहे. प्रमुख पाहुणे ९५ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे आणि ज्येष्ठ व्याकरण तज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख असणार आहेत. अध्यक्षस्थानी डॉ. शमसुद्दीन तांबोळी असतील. या कार्यक्रमात तीन वर्षांचे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
मुस्लीम सत्यशोधक पत्रिकेच्या तिमिरभेद यावर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन यावेळी होईल. मुस्लीम समाजातील अंधश्रद्धांचा वेध घेणारे हे पुस्तक असून संपादक मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दिन तांबोळी आहेत.
सुवर्णजयंती विशेष पुरस्कार डॉ. पी. ए. इनामदार, पुणे यांना दिला जाणार आहे. समाजप्रबोधन पुरस्कार पद्मश्री मा. तिस्ता सेटलवाड, मुंबई यांना तसेच प्रा. जहीर अली, वसई यांना दिला जाईल. विशेष सत्कार यवतमाळचे पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ-पाटील यांना देण्यात येणार आहे.
पुरस्कार २०२१ : स्वातंत्र्यसैनिक बाबुमियाँ बँडवाले राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार सलाहुद्दीन शेख, भिवंडी यांना तर प्रा. वि. अ. शेख युवा कार्यकर्ता पुरस्कार जावेद शाह, शिर्डी यांना दिला जाईल.
पुरस्कार २०२२ : समाजकार्य व प्रबोधन पुरस्कार मा. डॉ. एम. बी शेख, कोल्हापूर यांना देण्यात येईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App