औरंगाबादमधील एमआयएमचे 10 नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला, एमआयएममध्ये फुट पडल्याची ऑडिओ क्लिप व्हायर,


औरंगाबादमधील एमआयएम पक्षात मोठी फुट पडल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. एमआयएमचे 10 नगरसेवक राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. यामुळे खासदार इम्तियाज जलील चांगलेच अडचणीत आले आहेत.Audio clip of MIM corporators viral, defection in party


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद: औरंगाबादमधील एमआयएम पक्षात मोठी फुट पडल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. एमआयएमचे 10 नगरसेवक राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या गळाला लागल्याची चर्चा आहे. यामुळे खासदार इम्तियाज जलील चांगलेच अडचणीत आले आहेत.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. शहरातील एमआयएम पक्षात फूट पडणार असल्याचे संभाषण या क्लिपमध्ये असून त्यात काही नगरसेवकांची नावेही घेण्यात आली. त्यामुळे एका नगरसेवकाने थेट पोलीस स्टेशनही गाठले.



शहरात सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेल्या या क्लिपमधील संभाषण अत्यंत खळबळजनक आहे. एमआयएम पक्षातील तब्बल 10 नगरसेवक राष्ट्रवादीत जाणार असल्याचे यात सांगण्यात आले आहे. तसेच माजी नगरसेवक अज्जू नाईकवाडी यांचे नाव ऑडिओ क्लिपमध्ये उघडपणे घेण्यात आले.

एम.पी. या व्हॉट्सअप ग्रुवर याची जोरदार चर्चा झाली. या सर्व प्रकाराला कंटाळून अज्जू नाईकवाडी यांनी सिडको ठाण्यात तक्रार दाखल केली.या क्लिपमध्ये माझ्यासोबत जेवण झाले, त्यांनी होकार दिल्याचे बोलले गेले आहे. पण मुळात मला राष्ट्रवादीचे कुणी भेटलेच नाही. त्यामुळे माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असे नाईकवाडी यांनी म्हटले आहे.

Audio clip of MIM corporators viral, defection in party

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात