देशातली लोकशाही वाचवू; सरदार पटेल यांना श्रद्धांजली वाहताना राहुल गांधींची मोदी सरकारवर टोलेबाजी


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यानंतर देशातील सर्व संस्थानांचे आपल्या राजकीय कर्तृत्वाने आणि कठोर धोरणाने भारतीय संघराज्यात विलीनीकरण करून घेणाऱ्या पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहताना काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी केंद्रातल्या मोदी सरकारवर जोरदार टोलेबाजी केली आहे. Save democracy in the country; While paying homage to Sardar Patel, Rahul Gandhi lashed out at the Modi government

आज आपण सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मरण आवर्जून केले पाहिजे. कारण देशामध्ये लोकशाही मजबूत करण्यासाठी ज्या अनेक काँग्रेस नेत्यांनी आवाज उठवला त्यापैकी एक महत्त्वाचा आवाज सरदार वल्लभभाई पटेल यांचा होता, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. भारतात सध्या लोकशाही धोक्यात असताना सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मरण आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल. भारताची लोकशाही वाचविणे हीच खऱ्या अर्थाने सरदार वल्लभाई पटेल यांना श्रद्धांजली ठरेल, असेही राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.



सरदार पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय लोकशाहीचे गोडवे गाताना राहुल गांधींनी एक प्रकारे केंद्रातल्या मोदी सरकारवरच टोलेबाजी केल्याचे मानण्यात येत आहे. मोदी सरकारच्या काळात संसद, कार्यकारी मंडळ आणि न्यायालय या तीनही लोकशाही स्तंभांवर अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी आणि अन्य काँग्रेस नेत्यांनी वारंवार केला आहे. या पार्श्वभूमीवर सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहताना देखील राहुल गांधी यांनी देशातली लोकशाही वाचविले पाहिजे हाच मुद्दा अधोरेखित करत मोदी सरकारला टोले हाणले आहेत.

Save democracy in the country; While paying homage to Sardar Patel, Rahul Gandhi lashed out at the Modi government

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात