प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. जितेंद्र आव्हाडांचा मंत्रालयाच्या समोर “शिवगड” हा बंगला आहे. या बंगल्यासमोर या महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी तेथे हजर असलेल्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे. या महिलेने स्वतःवर ज्वलनशील पदार्थ टाकून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी तिला अडवले. Attempt to commit suicide by a woman in BDD chali outside Jitendra Awhad’s house
पोलिसांकडून तपास सुरू
तृप्ती कांबळे असे या आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव असून ही महिला बीडीडी चाळीत राहण्यास आहे. या घटनेनंतर या महिलेला मरीन लाईन्स पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या महिलेने इतके टोकाचे पाऊल का उचलले?, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी बीडीडी चाळीसंदर्भात बुधवारी एक महत्वपूर्ण बैठक झाली. यावेळी पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेले कर्मचाऱ्यांना बीडीडी चाळीत आता हक्काचे घर मिळणार असल्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. बीडीडी चाळीत २२५० निवृत्त पोलिसांना घर मिळणार आहेत. मात्र, त्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांनी ५० लाख रुपये घरासाठी किंमत द्यावी लागणार आहे, अशी माहिती आव्हाड यांनी आपल्या अधिकृत ट्विटवर दिली आहे.
या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे का?, याचाही तपास पोलीस करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App