वृत्तसंस्था
मुंबई : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी पंच राहिलेल्या प्रभाकर साईल यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. त्यांचे वकील तुषार खंडारे यांनी ही माहिती दिली. प्रभाकर साईलचा शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे ते म्हणाले. चेंबुरच्या माहुल येथील घरी त्यांचा मृत्यू झाला आहे. Aryan Khan Case Prabhakar Sail Death
आर्यन खान हा अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आहे. गेल्या वर्षी कार्डिलिया क्रूझवरील कथित रेव्ह पार्टीत सापडला होता. एनसीबीचे तत्कालीन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली होती. या कारवाईवर वानखेडेंनी खंडणी उकळल्याचे आरोप झाले होते. या प्रकरणात प्रभाकर साईल पंच होता. आज त्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
आर्यन खान याच्या अटकेनंतर किरण गोसावी चर्चेत आला होता. साईल हा गोसावीचा बॉडीगार्ड होता. आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे यांनी खंडणी मागितली होती, असा आरोप साईल याने केला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App