श्रीलंकेत आणीबाणी जाहीर ; महागाईमुळे जनता संतप्त; जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आभाळाला


वृत्तसंस्था

कोलंबो : श्रीलंकेत आणीबाणी जाहीर केली आहे. महागाईमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून जनता संतप्त होऊन रस्त्यावर उतरली आहे. त्यामुळे राष्ट्रपती यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे, तेव्हापासून राष्ट्रपतींविरुद्ध लोकांचा रोष उफाळून येत आहे. गुरुवारी त्यांच्या निवासस्थानाबाहेर हिंसक निदर्शनेही झाली. प पोलिसांनी आंदोलकांवर पाण्याचा वापर केला, लाठीमारही केला
स्वातंत्र्यानंतर श्रीलंका पहिल्यांदाच अशी भीषण परिस्थितीत झाली आहे. संतापलेले लोक आता श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचे घर जाळण्यासही मागेपुढे पाहत नाहीt. यामुळे श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपाक्षे य़ांनी आणीबाणी जाहीर केली आहे.  Sri Lanka declares emergency; Inflation angers masses; Commodity prices skyrocketदेशाची सुरक्षा आणि आवश्यक सेवांच्या पुरवठ्यासाठी हा निर्णय घेतल्याचे आदेशात म्हटले आहे. एक एप्रिलपासूनच आणीबाणी लागू केली आहे. देशात तसरकारविरोधात निदर्शनं तीव्र झाली आहेत. देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे, त्यामुळे हा निर्णय राष्ट्रपती राजपक्षे यांनी घेतला आहे.
श्रीलंकेच्या विविध भागात निदर्शने सुरु आहेत. पोलिसांशी चकमक होत आहे, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहे. विजेचे मोठे संकट निर्माण झाले आहे, देश अंधारात आहे. बस आणि व्यावसायिक वाहनांसाठी डिझेल शिल्लक नाही.

श्रीलंकेच महागाईचा दर १७ टक्क्यांहून पुढे गेला आहे. एक कप चहासाठी १०० रुपये तर ब्रेड, दूध यासाठी मोठी किंमत चुकवावी लागत आहे. ब्रेडचं एक पॅकेट १५० रुपयांना तर एक किलो दूध पावडर १९७५, एलपीजी सिलिंडर ४११९, पेट्रोल २५४ तर डिझेल १७६ रुपये प्रति लीटर आहे. श्रीलंका जीवनावश्यक वस्तूंची टंचाई आहे. जर या वस्तूंच्या किमती अशाच राहिल्या तर उद्या कुटुंबाला काय खायला घालणार याची आता लोकांना खूप भीती वाटू लागली आहे.

Sri Lanka declares emergency; Inflation angers masses; Commodity prices skyrocket

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात