पंढरपुरातील श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर पुन्हा सुरू


वृत्तसंस्था

पंढरपूर : पंढरपुरातील श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन आजपासून(२ एप्रिल) गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू झाले. याशिवाय श्री विठ्ठलाची चंदन पूजा, पाद्य पूजा देखील सुरू होत आहे.Padasparsha Darshan of Sri Vitthal at Pandharpur Resume on the Gudi Padva

कोरोनापासून बंद असलेलं विठुरायाचं थेट दर्शनही भाविकांना घेता येणार आहे. गुढीपाडव्या निमित्त मंदिरात फळे आणि फुलांची आकर्षक सजावटही केली आहे.श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ही माहिती दिली आहे.



कोरोणामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर १७ मार्च २०२० रोजी बंद केले होत. त्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी म्हणजेच दिवाळी पाडव्याला मंदिर पुन्हा सुरू झाले. तर, दुसऱ्या लाटेत १२ एप्रिल रोजी मंदिर पुन्हा बंद करावे लागले. त्यानंतर नुकतेच कार्तिकी एकादशीला मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले होते. श्री विठ्ठलाचे केवळ मुखदर्शनच सुरू होते, पदस्पर्श दर्शन बंदच होते.

Padasparsha Darshan of Sri Vitthal at Pandharpur Resume on the Gudi Padva

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात