विशेष प्रतिनिधी
बीड: Valmik Karad कोण आहे वाल्मीक कराड? सरकार आणि संविधानापेक्षा मोठा आहे का? त्याला दोन दिवसात आत नाही टाकले तर पुन्हा आम्हाला आंदोलन करायला भाग पाडू नका. असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिला आहे.Maratha Kranti
आबासाहेब पाटील यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली. महाराष्ट्र आणि बीड जिल्हा शांत ठेवायचा असेल तर सरकारला दोन दिवसाचा अल्टीमेटम आहे. दोन दिवसात सर्व आरोपी अटक करा. 36 जिल्ह्यातील सर्व संघटना मराठा एकत्रित झालेले आहेत.
आमचे सरकारला एव्हढेच सांगणे आहे की फक्त एसपीची बदली करून चालणार नाही. पोलीस प्रशासनाला तोडगा काढावा लागेल. कलेक्टर, तहसीलदार हे रॅकेट आहे. महिन्याच्या आत मर्जीतील सगळ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करा अशी मागणी ही मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वयक आबासाहेब पाटील यांनी केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App