वृत्तसंस्था
मुंबई : १०० कोटींच्या खंडणी वसूली प्रकरणात ED अर्थात सक्तवसूली संचलनालयाची कायदेशीर कारवाई पुढे सरकली असून ठाकरे – पवार सरकारचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाख रूपयांची प्रॉपर्टी ED ने जप्त केली आहे. यामध्ये त्यांची पत्नी आरती देशमुख यांच्या नाववर असलेला वरळीतील फ्लॅटचाही समावेश आहे.Anil Deshmukh’s flat in Worli, Mumbai, Nagpur property worth Rs 42 million seized from ED
अनिल देशमुख हे सुप्रिम कोर्टापर्यंत जाऊन आपल्यावरील कारवाई टाळण्याचा प्रयत्न करीत असले, तरी त्यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. ईडीने अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरांवर छापे घातले होते. त्यांना चौकशीसाठी तीनदा समन्स बजावले आहे. तरीही ते चौकशीला सामोरे आलेले नाहीत. ते सध्या कोर्टात आपल्यावरील कारवाई टाळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
पण ED ने त्यांच्या बरोबरच त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलाला देखील चौकशीसाठी समन्स बजावले आहे. हे समन्स अजून ऍक्टीव्ह असतानाच आता त्यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. देशमुखांच्या पत्नी आणि मुलगा हे दोघेही चौकशीसाठी समोर आलेले नाहीत.
आता अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाख रुपये किंमतीची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ही मालमत्ता अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची आहे. मुंबई आणि नागपूरमधील ही मालमत्ता असल्याची माहिती आहे.
Enforcement Directorate (ED) says it has attached immovable assets worth Rs 4.20 crores belonging to former Maharashtra Home Minister Anil Deshmukh and his family under PMLA in a corruption case pic.twitter.com/iNafh7iI2o — ANI (@ANI) July 16, 2021
Enforcement Directorate (ED) says it has attached immovable assets worth Rs 4.20 crores belonging to former Maharashtra Home Minister Anil Deshmukh and his family under PMLA in a corruption case pic.twitter.com/iNafh7iI2o
— ANI (@ANI) July 16, 2021
आज जप्त करण्यात आलेला वरळीमधील फ्लॅट अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांच्या नावाने रजिस्टर असून २००४ मध्ये या फ्लॅटची पूर्ण रक्कम रोख स्वरूपात देण्यात आली होती. मात्र, तरीदेखील त्याचे विक्रीखत थेट फेब्रुवारी २०२० मध्ये करण्यात आलेले आहे.
अनिल देशमुख यावेळी राज्याचे गृहमंत्री होते. तसेच, अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांनी प्रिमियर पोर्ट लिंक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची ५० टक्के मालकी अवघ्या १७.९५ लाख रुपयांना खरेदी केली. मात्र, त्याची बाजारभावानुसार किंमत जवळपास ५ कोटी ३४ लाखांच्या घरात आहे, असे देखील ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App