दहशतवाद, तालिबानवरील प्रश्नांना उत्तरे देणे टाळून इम्रान खान यांच्या RSS वर दुगाण्या; ताश्कंदमधला प्रकार

वृत्तसंस्था

ताश्कंद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानाने पाळलेल्या दहशतवाद्यांचा प्रश्नावर उत्तर देणे टाळले. तालिबान संदर्भातील प्रश्नालाही त्यांनी उत्तर दिले नाही. परंतु, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांबाबत प्रश्नाला उत्तर देताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर RSS दोषारोप करून ते मोकळे झाले.Pakistan PM Imran Khan answers ANI question, ‘can talks and terror go hand in hand?’. Later he evades the question on whether Pakistan is controlling the Taliban.

मध्य आणि दक्षिण आशिया परिषदेला उपस्थित राहण्यासाठी इम्रान खान चाललेले असताना एएनआय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने त्यांना अडवून दहशतवाद आणि भारत – पाकिस्तान चर्चा हातात हात घालून चालू शकतात का, हा थेट प्रश्न विचारला.त्यावर मागे वळून ते उत्तरले, की आम्ही म्हणजे पाकिस्तान तर किती वर्षे वाट पाहतोय की भारत आणि पाकिस्तान नागरी प्रशासनात उत्तम शेजाऱ्यासारखे राहिले पाहिजे. पण आम्ही काय करणार दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये भारतातल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी RSS ideology आडवी येते आहे.

एवढे बोलून इम्रान खान निघून गेले. पण तेवढ्यात तेथे छोटे नाट्यही घडले. दहशतवाद आणि तालिबान यांच्या बाबतचे प्रश्न विचारत एएनआयचा पत्रकार आणि कॅमेरामन इम्रान खान यांच्या मागे गेला.

पण त्याच्या प्रश्नांनी उत्तरे देणे त्यांनी टाळले. इम्रान खान यांच्या सुरक्षा रक्षकांनी या पत्रकाराला आणि कॅमेरामनला अडविण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानचे मंत्री शेख रशीद तर म्हणाले देखील अब बस कर यार…!!इम्रान खान यांच्या नेमक्या प्रश्नांना उत्तरे देण्याची टाळाटाळ ताश्कंदमध्ये, पाकिस्तानात आणि भारतात चर्चेचा विषय बनली आहे.

PM Imran Khan answers ANI question, ‘can talks and terror go hand in hand?’. Later he evades the question on whether Pakistan is controlling the Taliban.

महत्त्वाच्या बातम्या