तालिबानच्या वाढत्या वर्चस्वामुळे परदेशी अधिकारी परतू लागले मायदेशी


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – भारताने कंदाहारमधील आपल्या वकीलातीमधील ५० राजनैतिक अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांना मायदेशी परत आणले आहे. कंदाहारमधील भारताचे राजनैतिक अधिकारी, वकीलातीमधील कर्मचारी आणि भारत-तिबेट सीमा पोलिस दलाचे जवान यांना परत आणण्यासाठी भारतीय हवाई दलाने विशेष विमान कंदाहारला पाठविले होते. गेल्या आठवड्यात चीननेही त्यांच्या २१० अधिकारी-कर्मचाऱ्यांना मायदेशी परत नेले होते. Indian peoples came from Kandhar to Delhi



कंदाहारजवळील गावांमध्ये अफगाणिस्तानचे सैनिक आणि तालिबानी दहशतवाद्यांमध्ये तुंबळ लढार्इ सुरु असल्याने वकीलातीमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या काळासाठी हलविले असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. वकीलात बंद केली नसून स्थानिक कर्मचाऱ्यांच्या साह्याने तिचे कामकाज सुरुच राहणार आहे.

अमेरिकेची सैन्यमाघारीची प्रक्रिया सुरु असतानाच तालिबानी दहशतवाद्यांचे वर्चस्व वाढत असून त्यांनी अनेक जिल्ह्यांवर ताबा मिळविला आहे. संघर्ष वाढल्याने दोन देशांनी मझार ए शरीफ येथील आपल्या वकीलाती बंद केल्या आहेत.

Indian peoples came from Kandhar to Delhi

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात