कोणाला काही आक्षेप असेल तर त्यांनी …असं म्हणत अंधश्रद्धा निर्मुलन समितीला आव्हान दिले आहे.
विशेष प्रतिनिधी
पुणे : सनातन भारतीय संस्कृती आणि हिंदू एकात्मता मजबूत करण्यासाठी आम्ही ‘दरबार’ आयोजित करतो. याबाबत कोणाला काही आक्षेप असेल तर त्यांनी न्यायालयात येऊन आपले म्हणणे मांडावे. अशा शब्दांत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला धीरेंद्र शास्त्रींनी आव्हान दिले आहे. Amend the constitution for Hindu Rashtra Dhirendra Shastri alias Bageshwar Dham demands
तसेच, बागेश्वर धाम सरकारने सांगितले की भारतीय संविधानात आतापर्यंत 700 वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे. अशा स्थितीत हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी एकदा दुरुस्ती करावी.
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींना महाराष्ट्रात No Entry! नाना पटोलेंनी केला विरोध, मुख्यमंत्री शिंदे यांना लिहिले पत्र
पुण्यात जगदीश मुळीक फाऊंडेशनतर्फे संगमवाडी येथे तीन दिवसीय हनुमान सत्संग कथेचे आयोजन करण्यात आले असून बागेश्वर धाम सरकारतर्फे दिव्य दरबार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना धीरेंद्र शास्त्री बोलत होते. फाउंडेशनचे याप्रसंगी जगदीश मुळीक, योगेश मुळीक उपस्थित होते.
बागेश्वर धाम सरकारचे दावे घटनाबाह्य, अवैज्ञानिक आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे आहेत, असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने म्हटले होते. त्यामुळे त्यांच्यावर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणीही केली होती. त्यावर धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, सनातन हिंदू संस्कृतीच्या संवर्धनासाठी आम्ही दरबार भरवतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App