विशेष प्रतिनिधी
पुणे : बड्या बापाच्या पोराने पब मध्ये दारू पिऊन बेदरकार गाडी चालवून दोघांचा बळी घेतला त्या बड्या बापाच्या मुलाला वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे हे पहाटे पोलीस स्टेशनला गेलेच कशासाठी??, याचे उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी द्यावे, अशा परखड शब्दांमध्ये विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अजित पवारांना घेरले. Ambadas danve questions sunil tingare’s involvement in saving the culprit
कल्याणी नगर परिसरात पोर्शे कार बेदरकार चालवून ब्रह्मा बिल्डर्सचा मालक विशाल अग्रवाल याचा मुलगा वेदांत अग्रवाल याने एक युवक आणि एक युवती यांचे बळी घेतले. तो 17 वर्षांचा असल्याचे कारण दाखवून बाल न्यायालयाने त्याला जामीन दिला. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात छोटा राजन याच्याशी संबंध असलेले वेदांत अग्रवालचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी वेदांतच्या चांगल्या वर्तणुकीची हमी दिली.
पण त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे पहाटे 3.00 वाजता पोलीस स्टेशनला पोहोचले होते. त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तपास कामात हस्तक्षेप केला. गुन्ह्यांच्या नोंदी बदलायला लावल्या यासंदर्भात अजित पवारांनी आता उत्तर द्यावे, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली.
राजकीय क्षेत्रात येण्यापूर्वी सुनील टिंगरे हे विशाल अग्रवाल यांच्याकडेच इंजिनियर म्हणून नोकरीला होते. आपला तेवढ्यापुरताच त्यांच्याशी संबंध आला, असा दावा टिंगरे यांनी केला. स्वतः अजित पवारांनी देखील अपघात घडल्यानंतर 3 दिवसांनी त्या प्रकरणात लक्ष घातले. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी भोवती संशयाचे वातावरण निर्माण झाले.
संपूर्ण राज्यभर या प्रकरणाचा गदारोळ उठल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात लक्ष घालून पोलिसांना कठोर कारवाई करायला लावली. कोरेगाव पार्क परिसरातल्या बेकायदा पब वर सरकारने फिरवले. पण दरम्यानच्या काळात अग्रवाल परिवार आणि अंडरवर्ल्ड तसेच राष्ट्रवादी काँग्रेस यांचे संबंध पुन्हा उघड्यावर आले. या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी थेट अजित पवारांना घेरून त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App