अजितदादांचे आमदार सोडून जाण्याची दिवसभर चर्चा; संध्याकाळी बैठकीत सगळे आमदार हजर ठेवून अजितदादांचा दणका!!

All MLAs are with ajit pawar and will remain with him

विशेष प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीत अजितदादांना आपल्या पत्नी सुनेत्रा पवारांना निवडून आणता आले नाही. लढवलेल्या 4 जागांपैकी फक्त सुनील तटकरे निवडून आले. त्यामुळे अजित पवारांच्या नेतृत्वाच्या बळावर विधानसभेची निवडणूक लढवता येणार नाही, याची खात्री पटल्याने अजितदादांसोबत गेलेले राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांकडे परत येतील, अशी मराठी माध्यमांनी जोरदार चर्चा दिवसभर घडवली. शरद पवार गटाच्या नेत्यांचे वेगवेगळे बाईट चालवले.All MLAs are with ajit pawar and will remain with him

परंतु प्रत्यक्षात अजितदादांनी मुंबईतल्या हॉटेल ट्रायडेंट मध्ये सायंकाळी सगळे आमदार बैठकीला हजर ठेवून मोठा दणका दिला. अजित पवारांनी ट्रायडेंट हॉटेलमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेतली. पुढच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला तरी चालेल, पण अजित पवार यांची साथ सोडणार नाही, असा निर्धार अजित पवार समर्थक आमदारांनी एकमताने व्यक्त केला, तसेच कुठलाही आमदार शरद पवार यांच्या पक्षातील आमदारांच्या संपर्कात नसल्याची ग्वाही देखील बैठकीला उपस्थित असणाऱ्यांनी दिली.

राष्ट्रवादी फुटल्यानंतर 40 हून अधिक आमदार हे अजित पवारांसोबत गेले. पण लोकसभेचे निकाल त्यांच्या अपेक्षेच्या विपरीत लागले. शरद पवारांनी 10 पैकी 8 खासदार निवडून आणले, तर दुसरीकडे अजित पवारांचा एकच खासदार निवडून आला. अजित पवार हे सुनेत्रा पवारांनाही निवडून आणू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमध्ये आता चलबिचल सुरू असल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी चालविल्या.

लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार गटाचे काही आमदार शरद पवार आणि भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला होता. सुनील तटकरे, धनंजय मुंडे भाजपसोबत जातील, असंही रोहित पवार म्हणाले होते. प्रत्यक्षात अजित पवारांनी हॉटेल ट्रायलंडमध्ये घेतलेल्या बैठकीत सगळे आमदार उपस्थित राहिले.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर दादांसोबत कोणते आमदार गेले? 

सरोज अहिरे

धर्माबाबा आत्राम

बाळासाहेब अजबे

राजू कारेमोरे

आशुतोष काळे

माणिकराव कोकाटे

मनोहर चांद्रिकेपुरे

दीपक चव्हाण

संग्राम जगताप

मकरंद पाटील

नरहरी झिरवाळ

सुनील टिंगरे

अदिती तटकरे

चेतन तुपे

दौलत दरोडा

राजू नवघरे

इंद्रनील नाईक

मानसिंग नाईक

शेखर निकम

अजित पवार

नितीन पवार

बाबासाहेब पाटील

अनिल पाटील

राजेश पाटील

दिलीप बनकर

अण्णा बनसोडे

संजय बनसोडे

अतुल बेनके

दत्तात्रय भरणे

छगन भुजबळ

यशवंत माने

धनंजय मुंडे

हसन मुश्रीफ

दिलीप मोहिते

किरण लहामटे

दिलीप वळसे

राजेंद्र शिंगणे

बबनराव शिंदे

सुनील शेळके

प्रकाश सोळंके

या सर्व आमदारांनी अजित पवारांच्या पाठीशी उभे राहण्याचा ठाम निर्धार केला.

All MLAs are with ajit pawar and will remain with him

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात