महिला IPS अधिकाऱ्याला अजितदादांची दमदाटी फोनवरून; पण सारवासारव मात्र x हँडल वरून; इतरांपुढे बुद्धी पाजळणारे रोहित पवारही सरसावले अजितदादांच्या समर्थनात!!

Ajitdada

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महिला IPS अधिकाऱ्याला अजित पवारांनी दमदाटी फोनवरून केली. पण हे प्रकरण अंगलट आलेले पाहताच सारवासारव मात्र x हँडल वरून केली. एरवी महाराष्ट्रात कुठल्याही खुसपटी कारणावरून स्वतःची बुद्धी पाजळणारे आमदार रोहित पवार सुद्धा अजितदादांच्या समर्थनासाठी पुढे आले.Ajitdada’s taunts to a female IPS officer over the phone; but Sarvasarav

करमाळा तालुक्यात अवैध खनाना विरोधात कारवाई करायला गेलेल्या आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फोनवरून दादागिरी केली. त्यांना कारवाई थांबविण्यासाठी दमदाटी केली. अजितदादांचा हा फोन व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठविली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर दादागिरी करतात असे चित्र यातून निर्माण झाले. सुरुवातीला अजितदादांच्या बाजूने याचे कुणी समर्थन केले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.



परंतु, अजितदादांनी केलेल्या दमदाटीचा विषय तापल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सौम्य शब्दांत अजितदादांचे समर्थन केले. त्यांच्या पाठोपाठ सुनील तटकरे यांनी देखील अजितदादांच्या बाजूने प्रतिक्रिया व्यक्त केली. पण हे सगळे दोघांनी पत्रकारांना बाईट देऊन केले.

स्वतः अजित पवार मात्र या प्रकरणात पत्रकारांसमोर आले नाहीत‌. त्यांनी x हँडलवर छोटी पोस्ट लिहून आपल्या वक्तव्याचे समर्थन केले. आपला उद्देश कायदेशीर कारवाईत हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर तिथली परिस्थिती शांत राहावी. परिस्थिती अधिक बिघडू नये. याची काळजी घेण्याचा होता. कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे, असा खुलासा अजित पवारांनी आपल्या x हँडल वरून केला.

एरवी कुठल्याही खुसपटी कारणावरून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना केंद्रीय अर्थमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना सल्ला देणारी स्वतःची बुद्धी पाजळणाऱ्या रोहित पवारांनी अजित पवारांच्या समर्थनाची पोस्ट लिहिली. अजित पवार साधे बोलले तरी ते रागावल्यासारखे बोलले सारखे वाटते, असा दावा रोहित पवारांनी त्या पोस्टमधून केला. अजितदादांची कार्यपद्धती स्पष्टवक्तेपणाची आहे, असे लिहून रोहित पवारांनी त्यांच्या दादागिरीचे समर्थन केले. करमाळा प्रकरणात महिला पोलीस अधिकाऱ्याची कुठलीही चूक नाही असा परस्पर निर्वाळा रोहित पवारांनी दिला.

पण या सगळ्यातून स्पष्टवक्तेपणाच्या नावाखाली पवार घराण्याची दादागिरी करण्याची प्रवृत्ती आणि सत्तेची मस्ती उघड्यावर आल्याशिवाय राहिली नाही.

Ajitdada’s taunts to a female IPS officer over the phone; but Sarvasarav is only through the x handle; Rohit Pawar, who is smarter than others, also came out in support

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात