सुनेत्रा पवारांसाठी आणणार लीड कुठून किती??; अजितदादांनी जाहीरपणे सांगितली रणनीती!!

विशेष प्रतिनिधी

पुणे :  बारामती लोकसभा मतदारसंघातील लढाई काका विरुद्ध पुतण्या नणंद विरुद्ध भावजय अशी असली, तरी ती पवारांच्या चाणक्यगिरीची माध्यम निर्मित प्रतिमा विरुद्ध अजित पवारांचे प्रत्यक्ष जमिनी स्तरावरचे काम अशी बदलल्याचे चित्र आहे. “पवारांनी डाव टाकला”, “पवारांनी चाणक्य खेळी केली”, बारामती मधल्या दुष्काळी गावांमध्ये जाऊन सभा घेतल्या अशा सगळ्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या, पण प्रत्यक्षात पवारांच्या बरोबर बारामती मतदारसंघातले नेमके लोक किती आणि कुठले आहेत??, याविषयी मात्र मौन बाळगले. Ajitdada publicly stated the strategy!

त्या उलट अजित पवारांनी सुनेत्रा पवारांसाठी बारामती लोकसभा मतदारसंघात नेमके कोण कुठून आणि किती लीड आणणार??, याचा तपशीलवार खुलासाच आज सुनेत्रा पवारांचा अर्ज भरल्यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत सांगून टाकला. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील हजर होते त्यांच्यासमोर अजितदादांनी बारामती लोकसभा मतदारसंघात असलेल्या 6 विधानसभा मतदारसंघांची नावे घेऊन तिथले कोणकोणते नेते कसे लीड आणतील, हे जाहीरपणे सांगितले.

पुण्यात आज झालेल्या महायुतीच्या सभेत अजित पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील नेत्यांची नावे सांगत सुनेत्रा पवार यांना मतदारसंघातून मोठे लीड देण्याचे आवाहन केले. त्यातून त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघ मात्र वगळला. बारामतीमध्ये लीड मिळणार की नाही हे बारामतीकरचं सांगतील, असे अजितदादा म्हणाले.


राज्यातील निवासी डॉक्टरांनी प्रस्तावित संप घेतला मागे, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले होते आवाहन


इंदापूर मतदारसंघात हर्षवर्धन पाटील, दत्तामामा भरणे, प्रवीण माने हे एकत्र आल्याने तिथे 100 % लीड मिळालेच पाहिजे. त्यासाठी ते मदत करत आहेत. पुरंदर-हवेलीमध्ये विजय शिवतारे, अशोक टेकवडे, दिंगबर दुर्गाडे प्रयत्न करत आहेत. तिथेही लीड मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे अजित पवार म्हणाले.

खडकवासला तर नेहमीच भाजपच्या मागे उभा राहिला आहे. तिथे तर रासपचे चिन्ह माहिती नसताना 65000 लीड मिळाले. आता सगळ्यांनी काम केले तर लाखाच्यापुढे लीड मिळेल. त्याच पद्धतीने मुळशी, भोर, वेल्हामध्ये कुलदीप कोंडे आपल्यासोबत आहेत. तिथेही चांगले मताधिक्य मिळेल. दौंडमध्ये राहुल कुल, रमेश थोरात, प्रेमसुख कटारिया, वासुदेव काळे बरोबर आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ज्या गोष्टी ठरल्या आहेत, त्या पूर्ण करण्याचा शब्द मी देतो, असेही अजित पवार या वेळी म्हणाले. अजित पवारांचे भाषण सुरू असतानाच शिवसेनेचे नेते विजय शिवतारे हे कुलदीप कोंडेंना व्यासपीठावर घेऊन आले. ते उद्धव ठाकरेंच्या पक्षातून शिंदेच्या सेनेत येत असल्याचे समजताच अजितदादा म्हणाले, जे लाखाने मतं घेतात ते कुलदीप कोंडे देशमुख यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. भोर, वेल्हा, मुळशीमध्ये त्यांची किती ताकद आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. ही किमया विजय शिवतारेंनी केली आहे, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद.

विरोधक कसा असावा लागतो, हे यांच्याकडे बघून शिका. मित्रही कसा असावा लागतो, तेही विजयबापूंकडे बघून शिका. एकदा मैत्री केली की, पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल पण मैत्रीला अंतर पडू देत नाही. अशा पद्धतीचे काम विजय शिवतारेंचे असल्याचे कौतुक अजित पवारांनी केले.

Ajitdada publicly stated the strategy!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात