विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : शरद पवार आपले घर चालवावे तसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालवत होते. पक्षात एकाच व्यक्तीची हुकूमशाही चालू होती, अशा शब्दांमध्ये अजित पवार गटाने थेट शरद पवारांच्या घराणेशाही – हुकूमशाहीवर आज निवडणूक आयोगात हल्लाबोल केला.Ajitdada group will attack Sharad Pawar’s NCP’s dynasticism-dictatorship in Election Commission!!
खरी राष्ट्रवादी कोणाची शरदनिष्ठांची की अजितनिष्ठांची??, या विषयावर निवडणूक आयोगात युक्तिवाद सुरू आहे. या युक्तीवादादरम्यान अजित पवार गटाचे वकील नीरज किशन कौल आणि मनिंदर सिंह यांनी युक्तिवाद केला.
यापैकी वकील मनिंदर सिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची मूळ घटनाच निवडणूक आयोगासमोर वाचून दाखविली. या पक्ष घटनेनुसार पक्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अध्यक्ष पदाची कधी निवडणूक झाली नाही. शरद पवार कधीही निवडणुकीद्वारे निवडून येऊन अध्यक्ष झाले नाहीत, तर त्यांची नियुक्ती कायम नियुक्तीच होत राहिली आणि ते देखील राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःचे घर चालवावे तसाच पक्ष चालवत होते. पक्षांतर्गत निवडणुका कधी झाल्याच नाहीत. झाल्या त्या कायम नेमणूका अथवा नियुक्त्या. पक्षाच्या घटनेशी, लोकशाही तत्त्वांची आणि निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांशी शरद पवारांनी कायम प्रतारणा केली, असा युक्तिवाद मनिंदर सिंह यांनी केला. पक्षाची घटना आणि पक्षातला राजकीय व्यवहार यामध्ये खूप मोठी तफावत असल्याचे मनिंदर सिंह यांनी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिले.
मात्र, वेळी पक्षाच्या अध्यक्षपदी अजित पवारांची झालेली नियुक्ती नियमानुसार घडली. कारण देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांना पाठिंबा दिला. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे बहुमत अजित पवारांच्या पाठीशी आहे. पक्षाचे नागालँड मधले विधानसभा सदस्य देखील अजित पवारांच्या बाजूने आहेत, याकडेही मनिंदर सिंह यांनी निवडणूक आयोगाचे लक्ष वेधून खरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचीच आहे, असा दावा केला.
यापुढे शरद पवार गटाचा युक्तिवाद झाल्यानंतर निवडणूक आयोग अंतिम निर्णय देणे अपेक्षित आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App