‘राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकलं नसलं तरी…’


लोकसभा निवडणूक निकालावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली प्रतिक्रिया, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले?


विशेष प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतील अपेक्षित यश मिळालेलं नाही. महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीच्या जागा जास्त आल्या आहेत. तर महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यात केवळ एकच जागा निवडून आली आहे. यावर आता उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.Ajit Pawars reaction to the less seats won by the Mahayuti and the Nationalist Congress Party in the Lok Sabha elections

अजित पवार म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीला मतदान केलेल्या समस्त मतदार बंधु-भगिनींचे सर्वप्रथम मनापासून आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली ‘एनडीए’नं बहुमताचा टप्पा गाठला, त्याबद्दल प्रधानमंत्री महोदयांचं आणि ‘एनडीए’च्या सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन करतो. ‘एनडीए’च्या विजयासाठी गेले काही महिने सातत्यानं परिश्रम घेतलेले सर्व नेते, कार्यकर्ते, हितचिंतक, मतदार बंधू-भगिनी सर्वांना धन्यवाद देतो.’



तसेच, ‘राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकलं नसलं तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे. कुठलंही अपयश अंतिम नसतं. अपयशानं खचून न जाता नव्या उत्साहानं, उमेदीनं सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वत:ला लोकसेवेला वाहून घ्यावं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या नेत्यांकडून निकालाचं विश्लेषण केलं जाईल. त्यांच्या निष्कर्षाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागतील.’ असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.

याचबरोबर, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे रायगड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्यानं निवडून आले आहेत. त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. अरुणाचल विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आमदार निवडून आले आहेत. पक्षासाठी हे अभिमानास्पद यश आहे. पक्षाच्या या विजयी उमेदवारांचं हार्दिक अभिनंदन करतो. देशात लवकरंच सलग तिसऱ्यांदा स्थापन होणारं ‘एनडीए’चं सरकार जनतेच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करण्यात, देशाला महाशक्ती बनवण्यात यशस्वी होईल, याची खात्री आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ‘एनडीए’च्या सर्व विजयी उमेदवारांचं पुन:श्च अभिनंदन! पुनश्च धन्यवाद!’ असं म्हणत अजित पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Ajit Pawars reaction to the less seats won by the Mahayuti and the Nationalist Congress Party in the Lok Sabha elections

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात