विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ajit Pawar अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. आज देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत सर्व आमदारांनी एकमुखाने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. दरम्यान मुख्यमंत्रीपदाबाबत अजून अशी काही चर्चा झाली नाही. अजितदादा मुख्यमंत्री व्हावे ही अपेक्षा आहे, पण भाजपचे नेते ठरवतील ते मान्य असेल. काल विजयाचा आनंद आम्ही सगळ्यांनी साजरा केला. सत्ता स्थापनेच्या घडामोडी 48 तासात पूर्ण होईल, अभूतपूर्व यश राष्ट्रवादी पक्षाला मिळाले. राज्यात नवीन पर्व उदयास आला आहे, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. Ajit Pawar
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड
महायुतीमध्ये भाजपचे 132, तर शिवसेनेचे 57 आमदार विजयी झाले आहेत. तर अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे 41 आमदार विजयी झाले आहेत. यानंतर आज त्यांच्या बंगल्यावर बैठक घेत अजित पवार यांच्यावर गटनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दुसरीकडे, शिवसेना शिंदेंच्या पक्षाचे आमदार मुंबईत आलेह. मुंबईच्या वांद्रे येथील ताज अॅन्ड लॅड्समध्ये आमदार आले. हॉटेलमध्येच सर्व आमदारांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे यांची गटनेता म्हणून निवड झाली. Ajit Pawar
Nana Patole विधानसभेतील पराभवावर चिंतन करू, जनतेच्या प्रश्नांसाठी यापुढेही काम करू, नाना पटोलेंची प्रतिक्रिया
सुनील शेळकेंच्या मोदी भेटीचा किस्सा
अजित पवार यांनी सांगितले की, याची तर ओळख मी डायरेक्ट… आमच्यावेळी मोदींच्या सभेवेळी हा बाहेर थांबला. आमच्या इथे सगळे आमदार आत, शेवटी याला कोणी आतच घेईना. शेवटी मोदीसाहेब शेजारी बसल्यावर सांगितलं, माझा एक आमदार बाहेर थांबलाय, त्याला ताबडतोब आत घ्यायचा आहे. त्यांनी मागच्या सिक्युरिटीला सांगितलं, अजित पवार कोणाला बोलतात, त्याला आत घ्या. मग आत घेऊन सुनील शेळकेंची सेप्रेट ओळख करुन दिली, तोच फोटो त्याने सगळीकडे चालवला. कारण भाजप टोटली विरोधात. सुनील मला आधी म्हणायचा माझी सीट गेली. पण मतदानाच्या दिवशी म्हणाला माझी सीट एक लाखांनी निवडून येणार. माझ्यापेक्षा जास्त मताधिक्याने सुनील शेळके निवडून आला
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App