विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सत्तेवर असताना त्या आघाडीत राष्ट्रवादीच्या शरद पवारांची आणि अजितदादांची दादागिरी चालायची, त्यापैकी अजितदादांची दादागिरी महायुतीत पडली ढिल्ली म्हणून जयंत पाटील आणि संजय राऊत झाले आनंदी!!
महायुतीच्या मंत्रिमंडळाचा उद्या शपथविधी होणे अपेक्षित असताना भाजपचेच त्या मंत्रिमंडळावर वर्चस्व राहणार आहे. इतकेच काय पण भाजप गृह आणि अर्थ यांसारखी महत्त्वाची खाती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठेवूनच इतर खाती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देणार आहे महाराष्ट्राच्या जनतेने भाजपला मोठा कौल दिल्याने भाजप मंत्रिमंडळावर पूर्णपणे आपली छाप उमटवायच्या बेतात आहे.
या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंना अपेक्षित असलेले गृहमंत्री पद आणि अजितदादांना खात्री वाटणारे अर्थमंत्री पद मिळण्याची शक्यता भाजप महायुतीत शिल्लक उरलेली नाही, अशा बातम्या मराठी माध्यमांनी चालविल्या.
त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार विशेषता अजित पवारांना टोले हाणायची संधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि अजितदादांचे कायमच स्पर्धक राहिलेले जयंत पाटील यांना मिळाली. भाजप महायुतीमध्ये अजितदादांची “बार्गेनिंग पॉवर” संपली आहे. आता भाजप देईल, ती मंत्रिपदे त्यांना घ्यावी लागतील, असा टोला जयंत पाटलांनी अजित पवारांना हाणला.
त्यापुढे जाऊन संजय राऊत यांनी वेगळाच दावा केला. शरद पवारांच्या 8 खासदारांपैकी 5 खासदार फोडले, तरच अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याला केंद्रात मंत्री पद मिळेल, अशी अट भाजपने घातल्याचे असे संजय राऊत आज त्यांच्या नियमित पत्रकार परिषदेत म्हणाले.
शरद पवारांच्या उरलेल्या राष्ट्रवादीतले खासदार आणि आमदार आधीच अजित पवार किंवा भाजप यांच्याबरोबर जाऊन सत्तेच्या वळचळणीला बसायला उत्सुक असताना जयंत पाटील आणि संजय राऊत यांनी अजितदादांना टोले हाणायची संधी सोडली नाही. महाविकास आघाडीत काँग्रेसवर दादागिरी करणाऱ्या अजितदादांची “दादागिरी” महायुतीत मात्र भाजप समोर ढिल्ली पडली, हेच यातून सिद्ध झाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App