Tamil Nadu तामिळनाडूतील खासगी रुग्णालयास भीषण आग, 7 जणांचा मृत्यू

100 हून अधिक रुग्ण अडकले, बचाव कार्य सुरू Tamil Nadu

 विशेष प्रतिनिधी

चेन्नई : तामिळनाडूतील दिंडीगुल शहरातील एका खासगी रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 100 हून अधिक रुग्ण रुग्णालयात अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे रुग्णालय चार मजली आहे. रुग्णालयात आग लागल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णांना इतर रुग्णालयात हलविण्यासाठी खासगी रुग्णवाहिकांसह 50 हून अधिक रुग्णवाहिका बोलविण्यात आल्या आहेत. Tamil Nadu

अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस मदतकार्यात गुंतले आहेत. आगीमुळे रुग्णालयातील अनेक भागांचे मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाने सांगितले की, आगीची माहिती मिळताच, पथके तत्काळ घटनास्थळी पोहोचली आणि बचावकार्य सुरू केले. मात्र, रुग्णालयात प्रचंड धूर आणि आगीमुळे बचावकार्यात अडचणी येत आहे. Tamil Nadu

रुग्णालयात अडकलेल्या रुग्णांना बाहेर काढण्यासाठी विशेष रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रयत्नात 50 हून अधिक रुग्णवाहिका आणि खासगी रुग्णवाहिकांचाही समावेश करण्यात आला आहे, जेणेकरून रुग्णांना तातडीने इतर रुग्णालयात हलवता येईल.

स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कारवाई केली आहे. मृतांची संख्या आणि घटनेचे कारण शोधले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. मदतकार्यात सर्वतोपरी मदत केली जात असून आगीच्या कारणाचा तपास सुरू करण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. रुग्णालयात आग लागल्यानंतर रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये घबराट पसरली.

Massive fire breaks out at private hospital in Tamil Nadu 7 dead

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात