नाशिक : महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांना आता बारामती मतदारसंघात “रस” उरलेला नाही. तिथून त्यांनी 8 – 9 वेळा निवडणूक लढवून जिंकली. पण आता तिथून निवडणूक लढविण्यात “रस” उरलेला नाही, असे ते म्हणाले. अर्थात त्यांच्या बारामतीतला “रस” संपण्याला सुनेत्रा पवारांच्या पराभवाची पार्श्वभूमी आहे. बारामतीकरांनी अजितदादांचे न ऐकता शरद पवारांचे ऐकले आणि त्यांनी सुनेत्रा पवारांना निवडून देण्याऐवजी सुप्रिया सुळे यांनाच निवडून दिले. याचा हबका अजितदादांनी घेतलेला दिसतो आणि म्हणूनच त्यांचा बारामतीतला “रस” संपलेला दिसू लागला आहे. Ajit Pawar After leaving baramati may enter from maharashtra legislative council
याचा अर्थ अजितदादांचा राजकारणातला “रस” संपला असे नाही. उलट त्यांना तर आपल्या तोकड्या बळावर आणि इतरांच्या सत्तेच्या वळचणीला राहून मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यामुळे बारामतीतला “रस” संपला तरी राजकारणातला “रस” कसा संपवून चालेल??त्यामुळे अजितदादांचा राजकारणातला “रस” संपलेला नाही. पण बारामती उभे राहून जर सुनेत्रा पवार यांच्यासारखा पराभवाचाच सामना करावा लागणार असेल, तर आपल्या राजकारणाचे “अबॉर्शन” होईल, अशी भीती अजितदादांना वाटत असल्यास नवल नाही, पण म्हणून अजितदादा आपले राजकारण थांबवण्याची शक्यता नाही.
बारामतीतून लढायचे नाही, तर दुसरा पर्याय काय??, म्हणून आधीच अजितदादांनी चाचपणी देखील सुरू केली आहे. त्यासाठी आपले पुत्र जय पवार यांना रोहित पवारांच्या कर्जत जामखेड मध्ये धाडले. तिथे भाजपच्या नेत्यांशी संधान बांधले आणि रोहित पवारांविरुद्ध वातावरण निर्मिती करायला सुरुवात केली. अजितदादा कर्जत जामखेड मधून रोहित पवारांविरुद्ध लढून त्यांच्यावर मात करतील आणि आपले राजकारण तरंगत ठेवतील, असे बोलले जात आहे.
Kolkata rape : मृत्यूपूर्वी पीडितेला दिल्या जखमा, बलात्काराची पुष्टी, पण फ्रॅक्चर नाही; कोलकाता घटनेचा तपशीलवार पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर
पण अजितदादांपुढे फक्त कर्जत जामखेडचाच पर्याय आहे, असे मानणे पवार परिवाराच्या तिरक्या चालीच्या राजकारणाच्या दृष्टीने चूक ठरेल. कारण पवार परिवार कधीच सरळ राजकारण करताना आढळलेला नाही. किंबहुना आपले राजकारण तरंगत ठेवण्यासाठी सतत भूमिका बदलणे आणि कोलांटउड्या मारणे हे पवारांचे वैशिष्ट्य राहिले आहे. तेच वैशिष्ट्य अजितदादांमध्ये उतरले असल्यास नवल नाही. त्यामुळे एकीकडे बारामतीत आपल्याला “रस” उरला नाही, असे सांगणे आणि दुसरीकडे जय पवार यांना कर्जत जामखेड मध्ये धाडणे हे जरी घडले असले, तरी प्रत्यक्षात अजितदादा कर्जत जामखेड मधूनच लढतील, याची कुठलीही गॅरंटी नाही. उलट अजितदादा विधान परिषदेचा ही मार्ग चोखाळतील, अशी दाट शक्यता पवार परिवाराच्या तिरक्या राजकारणातून आणि आधीच्या अनुभवातून समोर येते.
2014 च्या मोदी लाटेची भीती
2014 च्या निवडणुकीत पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघातून उतरण्यापेक्षा राज्यसभेत जाणे पसंत केले होते. 14 च्या निवडणुकीतला मोदी लाटेचा अंदाज त्यांना आला होता. त्या लाटेत माढ्यातून आपण वाहून जाऊ ही भीती वाटल्यानेच पवारांनी सुमडीत कोंबडी कापून राज्यसभेचा रस्ता धरला होता. अर्थात त्यांनी आपल्या “त्या” खेळीला एक राजकीय वैचारिक मुलामा देखील दिला होता. तो म्हणजे आत्तापर्यंत मी 10 निवडणुका लोकांमधून लढलो. त्यापैकी कुठल्याही निवडणुकीत पराभूत झालो नाही. परंतु, आता लोकांमधून थेट निवडणूक लढवण्यापेक्षा इतरांना, विशेषतः तरुणांना तिथून संधी देणे आणि यासाठी आपण वरिष्ठ सभागृहात जात असल्याचे असल्याचे मखलाशी पवारांनी त्यावेळी केली होती. पण “त्या” खेळीचे टाइमिंग मात्र पवारांनी आपल्या पराभवाच्या भीतीने निवडले होते.
अजितदादांनाही बारामतीत सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर स्वतःच्या पराभवाची चाहूल लागल्याने त्यांनी काकांच्या पावलावर पाऊल टाकून विधानपरिषदेचा मार्ग निवडला, तर आश्चर्य वाटायचे कारण नाही. शिवाय त्यांनाही काकांसारखेच सांगण्याचे कारण उपलब्ध आहे. कारण अजितदादाही 8 – 9 निवडणुकांमध्ये बारामतीतून कधीच पराभूत झाले नव्हते. त्यामुळे आपल्याला बारामतीत आता “रस” उरला नाही. आपण वरिष्ठ सभागृहात प्रवेश करू असे सांगायला अजितदादा खरं म्हणजे मोकळे आहेत.
परंतु विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी किंवा अगदी जाहीर झाल्यानंतरही तसे सांगणे अजितदादांच्या पक्षासाठी उचित ठरणार नाही. किंवा अजितदादांनी तसे जाहीरपणे सांगितले, तर अजितदादा निवडणुकीच्या मैदानातून पळून गेले, असे नॅरेटिव्ह प्रस्थापित होईल आणि त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसेल, या भीतीपोटी अजितदादा तसे सांगत नसावेत. पण एकूण अजितदादांची वाटचाल कर्जत जामखेड कडे किंबहुना त्याहीपेक्षा विधान परिषदेकडे सुरू झाल्याचेच एकूण घडामोडींवरून दिसून येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App