विशेष प्रतिनिधी
मुंबई : पवार काका – पुतण्यांचा काल आणि आजचा उपरती होण्याचा दिवस ठरला. मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी पूर्वी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीस न जाता त्यावर बहिष्कार घालणाऱ्या पवारांना मराठा आंदोलकांनी जाब विचारायला सुरुवात केल्यानंतर अचानक सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची उपरती झाली. त्यांनी तशी सूचना मुख्यमंत्र्यांना केली. Ajit pawar accepts mistake of fielding sunetra pawar from baramati
पण तशाच प्रकारची उपरती पवार पुतण्यालाही आज झाली. बारामती लोकसभा मतदारसंघात पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर अजितदादांनी सुनेत्रा पवारांना महायुतीच्या पाठिंबावर राज्यसभेत खासदार केले. त्यानंतर आज उपरीती होत बारामतीच्या उमेदवारी बाबत चुकलो, असे अजितदादा एका मुलाखतीत म्हणाले. करून सवरून नामानिराळे राहण्याचे काका – पुतण्यांचे कसब यानिमित्ताने महाराष्ट्रासमोर आले.
जय महाराष्ट्र न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी बारामतीत बहीण सुप्रिया सुळेंविरुद्ध पत्नी सुनेत्रा पवारांना उभे करायला नको होते, याची कबुली दिली. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाने निर्णय घेतला. सुनेत्रा पवारांची उमेदवारी निश्चित केली. त्यामुळे एकदा बाण सुटला की मागे घेता येत नाही, तसे झाले. पण आज माझे मन मला सांगते, अशी लढाई व्हायला नको होती, असे वक्तव्य अजित पवारांनी केले.
Arvind Kejriwal : तिहार करागृह प्रशासनाचा आरोप- अरविंद केजरीवाल विशेषाधिकारांचा गैरवापर करत आहेत!
अजित पवार सध्या गुलाबी जॅकेट घालून महाराष्ट्रभर जनसन्मान यात्रेत फिरत आहेत. त्यात ते लाडकी बहीण योजनेचे मार्केटिंग करत आहेत. त्यामुळे त्या लाडकी बहीण योजनेवरूनच बारामतीतील लाडकी बहीण आठवते का??, असा सवाल विचारल्यावर अजित पवारांनी वर उल्लेख केलेले उत्तर दिले.
या उत्तरातून अजित पवारांची राजकीय चतुराई दिसलीच, पण त्याचबरोबर आपले सगळे राजकारण साधून घेतल्यानंतर दिलेली कबुली महाराष्ट्रासमोर आली. बारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांच्या लढाईत सुप्रिया सुळे जिंकल्या, पण तरी देखील अजितदादांचे फारसे नुकसान झाले नाही. कारण त्यांनी महायुतीच्या पाठिंब्याच्या बळावर लगेच सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर खासदार करून टाकले. त्यामुळे त्यांना जे साध्य करायचे होते, ते साधून झाले. वर बारामतीची लढाई घरातच लढायला नको होती, याची कबुली दिल्यामुळे अजितदादा स्वतःसाठीच बारामतीची सीट “सेफ” करून घेत आहेत का??, याची चर्चा सुरू झाली.
कारण बारामतीत आता विधानसभा निवडणुकीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी नव्या काका – पुतण्यांमध्येच लढाई होणार असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगते आहे. या अशी लढाई होणे अजितदादांसाठी फार मोठी “रिस्क” ठरू शकते याची जाणीव झाल्यानंतरच अजितदारांनी घरात लढाई नको, अशी आधीच कबुली देऊन तसेच संकेत शरद पवारांच्या गटाकडे पाठवलेत का??, अशीही सुप्त चर्चा आता सुरू झाली आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत घरातच लढाई करून मी चूक केली, पण विधानसभा निवडणुकीत तुम्ही तशी चूक करू नका, असा संदेश अजितदादांनी शरद पवारांच्या गटाला पाठवल्याचे बोलले जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more