पवारांना काटशह देण्यासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे महिनाअखेरीला रायगडच्या कर्जत मध्ये 2 दिवसीय अधिवेशन!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांकडून खेचून घेण्यासाठी अजित पवार निवडणूक आयोगात लढत असताना दुसरीकडे महाराष्ट्रात जमिनी स्तरावर पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते आपल्याकडे खेचून घेण्यासाठी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन रायगड जिल्ह्यातील कर्जत मध्ये बोलाविले आहे 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर 2023 या दोन दिवसांमध्ये हे अधिवेशन होणार आहे. Ajit Dada’s NCP will hold a 2-day convention in Raigad’s Karjat at the end of the month to give a cut to Pawar.

राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कोणाची शरद पवारांची की अजित पवारांची??, या विषयावरचा फैसला निवडणूक आयोगात आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टात होणार आहे. यासाठी आजपासून पुढचे सलग 3 दिवस निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. या सुनावणीला स्वतः शरद पवार, सुप्रिया सुळे तसेच अजित पवार आणि त्यांच्या गटातले नेते निवडणूक आयोगात उपस्थित राहणार आहेत.

एकीकडेही ही कायदेशीर लढाई लढत असताना अजित पवारांनी त्या पुढचे पाऊल टाकत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना काटशह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आपलीच आहे आणि ते आपल्याच कडे राहणार आहे, असे गृहीत धरून तसेच कार्यकर्त्यांच्या मनावर ते ठसविण्यासाठी 2 दिवसांचे अधिवेशन बोलवले आहे. 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर या दोन दिवसांमध्ये रायगड जिल्ह्यातील कर्जत मध्ये हे अधिवेशन होणार आहे.



तोपर्यंत कदाचित अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचे घड्याळाचे अधिकृत या मिळण्याची अपेक्षा आहे. पक्ष आणि चिन्ह एकदा आपल्या नावावर मिळाले की अजित पवार शरद पवारांच्या प्रभावक्षेत्रात आपले स्वतंत्र प्रभावक्षेत्र निर्माण करण्याच्या मागे लागणार आहेत. कर्जत मध्ये होणारे अधिवेशन हा त्याच राजकीय खेळीचा एक महत्त्वाचा भाग आहे.

अजित पवार यांनी बंड पुकारल्यानंतर शरद पवार सक्रीय झाले. त्यांनी राज्याचे दौरे केले. सभा घेतल्या. त्यांना उत्तर देण्यासाठी अजित पवार यांनी उत्तरसभा घेतल्या. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी अजितदादांची ही मोठी खेळी आहे.

मराठा पदाधिकारी बोलवण्यावर भर

या अधिवेशनला राज्यभरातून मराठा समाजातील पदाधिकारी, सर्व आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकारी अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न असणार आहे.

Ajit Dada’s NCP will hold a 2-day convention in Raigad’s Karjat at the end of the month to give a cut to Pawar.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात