विशेष प्रतिनिधी
मुंबई : Aditya thackeray उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक; पण कसेही करून घराणेशाहीचेच नेतृत्व लादू यामध्ये महाराष्ट्रातले ठाकरे + पवार माहीर आहेत. याचाच प्रत्यय आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आला. Aditya thackeray
उद्धव ठाकरेंचे त्यांच्या शिवसेनेच्या इतिहासातले सगळ्यात कमी आमदार निवडून आले. त्यावर कुठलेही आत्मपरीक्षण करण्यापेक्षा सामनातून विधानसभा निकालांवर तोफा डागण्यातच त्यांनी समाधान मानले. पण त्या पलीकडे जाऊन फक्त 20 आमदार निवडून आले, याचा राजकीय लाभ उद्धव ठाकरेंनी बेमालूमपणे उठाविला.
उद्धव ठाकरे यांनी आपला वारसदार आदित्य ठाकरेंची निवड शिवसेना विधिमंडळ नेतेपदी करून टाकली. शिवसेनेच्या मोठ्या पडझडीत ठाकरेंचे बडे – बडे शिलेदार पडले, पण आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघ राखला. त्यामुळे शिवसेनेच्या विधिमंडळ गटप्रमुख पदी आदित्य ठाकरे यांची निवड करण्यात उद्धव ठाकरेंना काहीच अडचण आली नाही. कारण त्या पदावर दावा सांगण्यासारखे बडे नेतेच निवडून येऊ शकले नाहीत. भास्कर जाधव निवडून आले, तर त्यांना विधानसभा गटप्रमुख पदी नेमले. सुनील प्रभू निवडून आले म्हणून त्यांना पुन्हा प्रतोद पदी नेमले. पण हे फक्त विधानसभेपुरत झाले.
आदित्य ठाकरे यांना मात्र विधानसभा आणि विधानपरिषद मिळून विधिमंडळ गटाचे नेते नेमले. स्वतः उद्धव ठाकरे सध्या विधान परिषदेचे सदस्य आहेत. आता ते देखील आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेतील. या राजकीय चतुराईतून उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांचे विधिमंडळ नेतृत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.
कुठल्याही पक्षाचा विधिमंडळ नेता हा थेट मुख्यमंत्रीपदाचा दावेदार असतो हे लक्षात घेता उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे कमी आमदार निवडून आले असताना आदित्य ठाकरे यांना पक्षाच्या विधिमंडळ पदी नेते नेमले म्हणजे आपल्या नंतरचा मुख्यमंत्री हा आदित्य ठाकरेच असेल हेच राजकीय चतुराईने सूचित केले. आदित्य ठाकरे आता विधिमंडळ नेता म्हणून कसा परफॉर्मन्स देतात??, ते सरकारला कोणत्या स्ट्रॅटेजीने अडचणीत आणतात??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर त्यांना विधिमंडळाच्या कामकाजाचा आणि खाचाखोचांचा अनुभव येण्याच्या दृष्टीने देखील त्यांना मिळालेले पद महत्त्वाचे आहे.
याबाबतीत उद्धव ठाकरे हे शरद पवारांना देखील सरस ठरले. कारण शरद पवार आपल्या मनातल्या वारसदारांना ना संसदेतला कुठला मोठा नेता बनवू शकले, ना विधिमंडळातला नेता बनवू शकले. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या दबावापोटी त्यांनी अजितदादांना सुरुवातीला उपमुख्यमंत्री आणि नंतर विरोधी पक्षनेते केले होते, पण “मनातल्या मुख्यमंत्र्यांना% अद्याप तरी कुठले मोठे संसदीय अथवा विधिमंडळ पद पवारांना देता आलेले नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App