महापरिनिर्वाण ‘ सिनेमाचा मुहूर्त संपन्न! अभिनेता प्रसाद ओकने व्हिडिओ शेअर करत दिली माहिती!


विशेष प्रतिनिधी

पुणे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित महापरिनिर्वाण या सिनेमाची घोषणा त्यांच्या गेल्या काही महिन्यात करण्यात आली होती. Actor Prasad oak upcoming movie mahaparinirvan

मराठी सिने सृष्टीतला दिग्गज दिग्दर्शक आणि अभिनेता प्रसाद ओक या मोठ्या प्रोजेक्टचा भाग आहे.
हा बहुप्रतिक्षित सिनेमाचं मुहूर्त नुकतंच पार पडलं . आणि या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे . अशी माहिती प्रसाद ओक याने आपल्या समाज माध्यमातून दिली .

याचा व्हिडीओ प्रसाद ओकनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने लिहीलं आहे की, “वंदनीय बाबासाहेबांचा आशीर्वाद घेऊन आज मुहूर्त संपन्न झाला… उद्यापासून चित्रीकरण सुरू…आपल्या शुभेच्छा आणि प्रेम पाठीशी असू द्या…”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीदिनाला ‘महापरिनिर्वाण दिन’ असं म्हटलं जातं. ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीतील बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानी त्यांचं निर्वाण झालं. त्यांच्या निधनाने सर्वांना मोठा धक्का बसला होता. संपूर्ण विश्वाचा श्वास रोखून धरणारा हा ऐतिहासिक क्षण होता. या क्षणावर आधारित ‘महापरिनिर्वाण’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमांच्या माध्यमातुनं हास्य जत्रा प्रेम गौरव मोरे देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

Actor Prasad oak upcoming movie mahaparinirvan

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात विठ्ठल रखुमाईला शोभुनी दिसतो तिरंगा!