विशेष प्रतिनिधी
बीड: रक्षकच भक्षक बनल्याचे उदाहरण बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे उघडीस आले आहे. एका अल्पवयीन मुलीवर सहा महिन्यांत चारशे जणांनी बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे त्यामध्ये दोन पोलीसांचाही समावेश आहे. एकाने हॉटेलमध्ये नेऊन अतिप्रसंग केला तर दुसऱ्याने घरीच नेऊन बलात्कार केला.400 people raped a minor girl, two policemen also participated
१६ वर्षे वयाच्या या अल्पवयीन विवाहितेची अंगावर शहारे आणणारी घटना आहे. अल्पवयीन पीडिता अवघ्या ९ वर्षांची असताना आईचे निधन झाले. त्यामुळे चुलत्याने १३ व्या वर्षीच तिचा विवाह उरकला. मात्र, सासरी छळ झाल्याने ती माहेरी आली. तेथे जन्मदात्या बापानेच तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला.
त्यामुळे अंबाजोगाईत भीक मागत भटकणाऱ्या या मुलीच्या वाट्याला नरकयातना आल्या. ९ नोव्हेंबर रोजी तिच्या तक्रारीवरून बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा, बलात्कार, बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. ११ रोजी पीडितेला बाल कल्याण समितीपुढे हजर केले होते.
यावेळी तिने सहा महिन्यात चारशे जणांनी अत्याचार केल्याची माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. अभय वनवे यांनी दिली होती. बालकल्याण समितीपुढे केलेल्या धक्कादायक खुलाशानंतर अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी बीडमध्ये पीडितेचा पुरवणी जवाब नोंदविला.
समुपदेशक मनीषा तोकले यांच्यासमोर नोंदविलेल्या पुरवणी जबाबात पीडितेने अत्याचार करणाऱ्या काही लोकांची नावे तर काहींचे वर्णन व घटनास्थळाची सविस्तर माहिती दिली. यात तिने दोन पोलिसांचाही उल्लेख केला आहे. त्यापैकी एकाने हॉटेलवर नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्याने तिला स्वत:च्या घरी नेऊन लैंगिक अत्याचार केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App