महाराष्ट्रात हिंसक आंदोलनामुळे सार्वजनिक मालमत्तेचे 12 कोटींचे नुकसान; पोलीस महासंचालकांची माहिती

प्रतिनिधी

मुंबई :  मराठा आरक्षणाचा दरम्यान झालेल्या हिंसाचारात महाराष्ट्रात आमदारांचे बंगले जाळले गेलेच, पण सार्वजनिक मालमत्तांचे तब्बल 12 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. हिंसक आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कायदेशीर कारवाई तपशील त्यांनी यावेळी सांगितले. 12 crore damage to public property due to violent agitation in Maharashtra

मराठा आरक्षणासाठी राज्यातील काही भागांमध्ये वातावरण तापलं आहे. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. बीड जिल्ह्यात तर आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्यालाच आंदोलकांनी आग लावली. तर माजी आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यालयाला आंदोलकांनी आग लावली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याच्या परिसरातही जाळपोळ करण्यात आली. त्यांच्या गाडीला आग लावण्यात आली. या घटनेनंतर बीड जिल्ह्यात संचारबंदी लावण्यात आली. या संचारबंदीत आज सकाळपासून शिथिलता देण्यात आलीय. पण जमावबंदी लागू आहे, असे रजनीश शेठ यांनी सांगितले.

राज्यात मराठा आरक्षणासाठी अनेक ठिकाणी आंदोलनं शांततेत झाली, तर काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. महाराष्ट्रात आंदोलकांकडून काही ठिकाणी कायद्याचं उल्लंघन करण्यात आलंय. तर काही ठिकाणी जाळपोळच्या घटनादेखील घडल्या आहेत. अशा ठिकाणी महाराष्ट्र पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तसेच आरोपींना अटक देखील केलीय”, असं पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी सांगितलं.

आतापर्यंत संभाजीनगर परिक्षेत्रात 29 ते 31 नोव्हेंबर तारखांच्या दरम्यान घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने 54 गुन्हे दाखल आहेत. तर 106 आरोपींना अटक केली आहे. त्यापैकी बीड जिल्ह्यात 20 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील 7 गुन्हे हे कलम 306 अंतर्गत दाखल करण्यात आले आहेत”, अशी माहिती रजनीश शेठ यांनी दिली.

‘या’ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद

“बीड शहरात सध्या जमावबंदीचे आदेश आहेत. तसेच बीड, संभाजीनगर ग्रामीण आणि जालना जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद आहे. महाराष्ट्रात 24 ते 31 नोव्हेंबरच्या दरम्यान एकूण 141 गुन्हे दाखल झाले आहेत आणि 168 आरोपींना अटक केली आहे. तर 146 आरोपींना कलम 41 नुसार नोटीस देण्यात आली आहे”, असं रजनीश शेठ यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान

“संपूर्ण महाराष्ट्रात अंदाजे सार्वजनिक मालमत्तेचे 12 कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. ज्या घटकांना अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता आहे त्यांना अतिरिक्त मनुष्यबळ दिलेलं आहे. आतापर्यंत 17 एसआरपीएफच्या कंपनी आम्ही वेगवेगळ्या घटनांका दिले आहेत. तसेच रॅपिड अॅक्शन फोर्सची कंपनी बीड जिल्ह्यात दाखल झाली आहे. 7000 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती रजनीश शेठ यांनी दिली.

कायद्याचं उल्लंघन करणारे, सार्वजनिक मालेमत्तेच नुकसान करणारे, तसेच जाळपोळ करणाऱ्या असामाजिक तत्व यांच्यावर पोलीस कडक कारवाई करेल. तसेच शांततेत सुरु असलेल्या आंदोलनाला पोलीस सहकार्य करतील. पोलिसांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणारे आणि सार्वजनिक मालमत्तेची जाळपोळ करणाऱ्या लोकांवर पोलिसांनी आवश्यक ती कारवाई करावी, असं रजनीश शेठ म्हणाले.

12 crore damage to public property due to violent agitation in Maharashtra

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात