वृत्तसंस्था
मुंबई : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने कोरोना रुग्णांना 100 बेड्स, 500 ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर देण्याचा संकल्प केला आहे. 100 beds and 500 Oxygen concentrater will be provided : Jacqueline Fernandez
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी अनेक कलाकार पुढे आले आहेत. सलमान खान, अक्षयकुमार, प्रियांका चोप्रा, अनुष्का-विराट, सोनू सूद अशी बरीच मंडळी आहेत. यात आता जॅकलीनही फाऊंडेशनद्वारे मदत करू लागली आहे. तिच्या योलो फाऊंडेशन मार्फत ती घाटकोपरच्या कोविड केअर सेंटरसाठी काम करत आहे. आता तिने आणखी मदत करण्याचे ठरविले आहे.
जॅकलीनने कोरोना योद्धयाच्या जेवणाची व्यवस्था केली होती. शिवाय, आपल्या योलो फाऊंडेशनकडून अनेकांना बेड्स मिळवून दिले. सध्या 100 बेड्सचं रुग्णालय आणि 500 ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर देता येतील का यावर तिचे काम चालू आहे.
ती म्हणते, सध्या दोन रुग्णवाहिका पुरवतो. त्यामुळे तातडीने रुग्णालयात जाता येईल. आणखी बेड्सची व्यवस्था झाली तर त्याचा फायदा रुग्णांना होऊ शकेल. रुग्णांसाठी हेल्पलाईनचा विचारही ती करते आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App