रशियाविरोधात लढण्यासाठी युक्रेनमधील महिलाही रणांगणात, महिला खासदाराचा एके रायफल घेतलेला फोटो व्हायरल


विशेष प्रतिनिधी

किव्ह (युक्रेन) : रशियाने हल्ला केल्यानंतर युक्रेनच्या महिलाही आता युध्दात उतरल्या आहेत. येथील खासदार किरा रुडिक हाती मशिन गन घेतलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर खासदार रुडिक यांनी ट्विट केले की तिला कलाश्निकोव्ह कसे वापरायचे हे माहित आहे.Women in Ukraine fight against Russia, photo of female MP with AK rifle goes viral

हे खूप खरे वाटते कारण काही दिवसांपूर्वी ते माझ्या मनात कधीच येत नव्हते. युक्रेनच्या पुरुषांप्रमाणेच आपल्या महिलाही देशाच्या मातीचे रक्षण करतील.रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा चौथा दिवस आहे. रशियन सैन्याकडून युक्रेनच्या अनेक शहरांवर आक्रमकतेने हल्ला सुरूच आहे.



पुतीन यांच्या आदेशानुसार सुरू असलेली लष्करी कारवाई थांबवावी म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्बंध आणि चर्चेच्या माध्यमातून रशियावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, परंतु अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. या हल्ल्यात युक्रेनमधील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली आहेत.

दरम्यान, रशियाच्या हल्ल्यात १९८ युक्रेन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर १००० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती युक्रेनचे आरोग्य मंत्री व्हिक्टर ल्याश्को यांनी दिली आहे.युक्रेन सरकारने आपल्या नागरिकांना सैन्यात भरती होऊन रशियाविरुद्ध हाती शस्त्र घेण्याचे आवाहन केले आहे.

सैन्यात भरती होण्यासाठी वयाची अट नसल्याचे युक्रेन सरकारने जाहीर केले आहे. या आवाहनानंतर सर्वसामान्य नागरिकांपासून ते खासदारांपर्यंत अनेकांनी देशाच्या रक्षणासाठी रशिया विरुद्ध हाती शस्त्र घेतले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, युक्रेनने आपल्या खासदारांना शस्त्रे वाटली आहेत.

Women in Ukraine fight against Russia, photo of female MP with AK rifle goes viral

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात