विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : जगातील इतर देशांना कोरोना प्रतिबंधक लशींचे आणखी दोन कोटी डोस पुरविणार असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सांगितले आहे.USA will provide 8 crore doses to world
चीन आणि रशियाने लशीच्या माध्यमातून जगावर प्रभाव टाकल्याचे बोलले जात असले तरी या क्षेत्रातही अमेरिकाच सर्वांत पुढे असल्याचे आम्ही दाखवून देऊ, असे बायडेन यांनी सांगितले.
ॲस्ट्राझेनेका कंपनीच्या सहा कोटी लशी चार जुलैपर्यंत जगभरात वितरीत करणार असल्याचे अमेरिकेने आधीच जाहीर केले होते. आता आज दोन कोटी लशींबाबत घोषणा करण्यात आली असून,
त्यामध्ये ॲस्ट्राझेनेका, मॉडर्ना, फायझर आणि जॉन्सन अँड जॉन्सन या कंपन्यांनी विकसीत केलेल्या लशींचा समावेश असेल.बायडेन म्हणाले की,‘‘पुढील सहा आठवड्यांमध्ये आम्ही जगाला लशींचे एकूण आठ कोटी डोस पुरविणार आहोत.
हे प्रमाण अमेरिकेत होणाऱ्या लस उत्पादनाच्या १३ टक्के इतके आहे. इतक्या प्रमाणात कोणत्याच देशाने लशी पुरविल्या नसून आतापर्यंत सर्वाधिक लशी पुरविणाऱ्या देशाच्याही पाच पट अधिक लशी अमेरिका देणार आहे. चीन आणि रशियानेही आतापर्यंत दीड कोटी देणगी म्हणून दिल्या आहेत.’’
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App