भारतातील कोरोनाचे थैमान जगासाठी धोक्याची घंटा, यूनिसेफचा इशारा


विशेष प्रतिनिधी

न्यूयॉर्क – भारतातील दुसऱ्या लाटेने जग देखील हादरले आहे. मृतांचा आणि रुग्णांचा दिवसेंदिवस वाढणारा आकडा पाहता जागतिक संघटनांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. यासाठी जगभरातून मदत केली जात असली तरी पुरेशी नसल्याचे युनिसेफचे म्हणणे आहे. UNICEF gave alert to world due to corona wave in India

भारतात कोरोनाने थैमान घातले असून ही स्थिती जगासाठी धोक्याची घंटी आहे. संपूर्ण जग जोपर्यंत भारताच्या मदतीसाठी धावणार नाही, तोपर्यंत भारतातील कोरोनाचा कहर दिसत राहील, असेही युनिसेफचे म्हणणे आहे.



यूनिसफेकडून आतापर्यंत भारताला २० लाख फेसशिल्ड आणि दोन लाख मास्कसह महत्त्वाच्या वैद्यकीय उपकरणाचा पुरवठा केला आहे. भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असून दररोज तीन ते चार लाख रुग्ण आणि तीन हजाराहून अधिक मृत्यूची नोंद होत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, भारतात कोरोनाबाधितांची एकूण संख्या २०.६ दशलक्ष असून २,२६००० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

दक्षिण आशियायी क्षेत्रातील अन्य देशातही रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु एकूण रुग्ण आणि मृतांच्या आकडेवारीचा विचार केल्यास भारताचे प्रमाण ९० टक्के आहे, असे संघटनेने म्हटले आहे.

UNICEF gave alert to world due to corona wave in India

महत्वाच्या  बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात