विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : नोव्हाव्हॅक्स लस आणि ऑक्सफर्ड-ॲस्ट्राझेनेका यांनी विकसीत केलेल्या लशीच्या पुरवठ्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि ‘युनिसेफ’ यांनी दीर्घकालिन पुरवठा करार केला आहे. या कराराच्या माध्यमातून जगभरातील जवळपास शंभर देशांसाठी एक अब्ज १० कोटी लशींचे डोस आपल्याला मिळतील, असे ‘युनिसेफ’ने म्हटले आहे.UNICEF will receive one billion doses of serum
औषधनिर्मितीमध्ये भारत आघाडीवर असून अनेक देश कोरोना प्रतिबंधक लशीसाठी भारताकडे विचारणा करत आहेत. ऑक्सफर्ड आणि ॲस्ट्राझेनेका यांनी विकसीत केलेल्या लशीचे उत्पादन सीरम इन्स्टिट्यूटतर्फे केले जात आहे. नोव्हाव्हॅक्सची निर्मिती अमेरिकेतील नोव्हाव्हॅक्स कंपनीने केली आहे.
सीरम करणार 100 देशांना कोरोना लसीचा पुरवठा ; युनिसेफ UNICEF सोबत केला करार
या दोन लशींचा दीर्घकाळ पुरवठा करण्याचा करार केल्याची घोषणा ‘युनिसेफ’च्या कार्यकारी संचालिका हेन्रीएटा फोअर यांनी केली. १४५ देशांमधील संसर्गाचा सर्वाधिक धोका असलेल्या नागरिकांपर्यंत या वर्षाच्या मध्यापर्यंत लस पोहोचणे आवश्यक असल्याचे सूत्रांचे म्हणे आहे.