युक्रेन युद्धामुळे वाढली भारतीय लष्कराची चिंता ; रशियन शस्त्रास्त्रांचा पुरवठा थांबण्याची भीती, देशात वाढवणार उत्पादन


 

रशियाने युक्रेनवर हल्ला केलेला आहे. दोन्ही देशांत युद्ध सुरू असल्यामुळे भारताच्या संरक्षणालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांना होणारा सुमारे 60 टक्के संरक्षण उपकरणांचा पुरवठा रशियाकडून होतो, मात्र युद्धामुळे हा पुरवठा बंद होण्याची भीती आहे.Ukraine war raises Indian military concerns Fear of Russian arms embargo raises fears


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : रशियाने युक्रेनवर हल्ला केलेला आहे. दोन्ही देशांत युद्ध सुरू असल्यामुळे भारताच्या संरक्षणालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांना होणारा सुमारे 60 टक्के संरक्षण उपकरणांचा पुरवठा रशियाकडून होतो, मात्र युद्धामुळे हा पुरवठा बंद होण्याची भीती आहे.

त्यामुळे भारतीय लष्कराकडे शस्त्रास्त्रांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. या तोट्याचा सामना करण्यासाठी भारत सरकारने या शस्त्रास्त्रांचे उत्पादन देशातच वाढवण्याची योजना आखली आहे.


Operation Ganga : परराष्ट्र मंत्री म्हणाले- पीएम मोदींच्या सांगण्यावरून रशिया आणि युक्रेनने गोळीबार थांबवला होता, म्हणून अनेक विद्यार्थी मायदेशी परतू शकले


एपीच्या अहवालानुसार, सरकारने गुरुवारी सांगितले की, मुख्य पुरवठादार रशियाकडून कोणतीही महत्त्वपूर्ण कमतरता टाळण्यासाठी सरकार देशातील लष्करी उपकरणांचे उत्पादन वाढवेल. यामध्ये हेलिकॉप्टर, टँक इंजिन, क्षेपणास्त्रे आणि हवाई पूर्व चेतावणी प्रणालीदेखील समाविष्ट आहे.

संरक्षण मंत्र्यांकडून संरक्षण आयात बंदीची तिसरी यादी जाहीर

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी लष्करी उपकरणांची तिसरी यादी जाहीर केली जी यापुढे आयात केली जाणार नाहीत आणि ती स्वदेशी बनवली जातील. ते म्हणाले, भारताकडे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सैन्य, चौथ्या क्रमांकाचे हवाई दल आणि सातव्या क्रमांकाचे नौदल आहे, जे केवळ आयातीवर अवलंबून राहू शकत नाही. भारताला संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्याचे आमचे लक्ष्य आहे.

देशांतर्गत उद्योगांना 2100 अब्ज रुपयांच्या ऑर्डर्स

संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, सरकार देशांतर्गत संरक्षण उद्योगाला 2100 अब्ज रुपयांच्या लष्करी उपकरणांच्या उत्पादनाची ऑर्डर देण्यात येईल. पुढील पाच वर्षांत करावयाच्या या उत्पादनाची जबाबदारी देशांतर्गत सरकारी आणि खाजगी संरक्षण उत्पादक अशा दोन्ही कंपन्यांना देण्यात येणार आहेत.

Ukraine war raises Indian military concerns Fear of Russian arms embargo raises fears

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात