संरक्षणात आत्मनिर्भरता, हेलिकॉप्टरपासून तोफखान्यासह १०५ शस्त्रात्रे भारतातच बनणार, शत्रुराष्ट्र सुरक्षा यंत्रणेत घुसखोरी


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला ‘आत्मनिर्भर भारत’चा नारा आता संरक्षण क्षेत्रातील ‘मेक इन इंडिया’ला बळकट करणार आहे. हेलिकॉप्टर, तोफखाना गन, मावरहित हवाई विमाने यांच्यासह १०१ क्षेपणास्त्रे भारतात बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील पाच वर्षांत टप्याटप्याने आयातबंदी करण्यात येणार आहेत.Self-reliance in defense, 105 weapons including helicopters and artillery to be made in India, infiltration of enemy security system

स्थानिक पातळीवर ही शस्त्रास्त्रे विकसित केली जाणार आहे. इतर देशांतून शस्त्रास्त्रे घेतल्यास संपर्काच्या वेगवेगळ्या पध्दतीने देशाच्या सुरक्षा यंत्रणेत शत्रु घुसू शकतो. त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली.राजनाथ सिंह म्हणाले, आयात केलेल्या शस्त्रांमध्ये सॉफ्टवेअर कोडशी तडजोड केली जाऊ शकते. ते देशाच्या सुरक्षा यंत्रणेसाठी धोकादायक ठरू शकते. संपर्क क्षेत्रातील वाढत्या तंत्रज्ञानामुळे कोणीही आता वेगवेगळ्या संपर्क पद्धतींच्या मदतीने देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत घुसू शकतो.

यंत्रणा कितीही मजबूत असली तरी ही यंत्रणा दुसऱ्या देशाशी जोडली गेल्यास सुरक्षेचा भंग होण्याची शक्यता असते. नवीन संरक्षण प्रणाली आणि प्लॅटफॉर्म इलेक्ट्रॉनिक आणि सॉफ्टवेअरद्वारे चालविली जातात. ते कोठूनही नियंत्रित किंवा नष्ट केले जाऊ शकतात. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.

संरक्षण मंत्र्यांनी यादीत समाविष्ठ केलेल्या शस्त्रांमध्ये २५० किलोमीटर अंतरावरील लक्ष्यांवर मारा करू शकणारी क्षेपणास्त्रे, लांब पल्ल्याचे मार्गदर्शित बॉम्ब, मध्यम श्रेणीची जहाजविरोधी क्षेपणास्त्रे , पाणबुडीतून लाँच केलेली क्रूझ क्षेपणास्त्रे , लांब पल्ल्याची टोपण आणि निरीक्षण प्रणाली (लॉरोस), शस्त्र शोधणारे रडार,

अत्याधुनिक गस्ती जहाजे, रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्र, काउंटर-ड्रोन प्रणाली, रॉकेट्स, टॉपेर्डो आणि इतर दारूगोळा यांचा समावेश आहे. आॅगस्ट २०२० मध्ये १०१ आणि आणि मे २०२१ मध्ये १०८ शस्त्रास्त्रे देशात बनविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नव्याने जाहीर केलेल्या यादीमुळे आता ३१० शस्त्रास्त्रे ‘मेक इन इंडिया’मध्ये आले आहेत.

युध्दामध्ये अत्यावश्यक असलेला दारुगोळ्याच्या बाबतही आयातीवर निर्भर राहणे आता बंद होणार आहे. देशांतगर्त उत्पादनातून दारूगोळा बनवून आत्मनिर्भरतेकडे लक्ष दिले जाणार असल्याचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

Self-reliance in defense, 105 weapons including helicopters and artillery to be made in India, infiltration of enemy security system

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण