रणधुमाळीचे विश्लेषण : कॉंग्रेसचा डाव शिवसेनाच उधळणार..? कोल्हापूर उत्तरमध्ये दुसरे मंगळवेढा घडेल??


विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : पक्षनेतृत्वाचे आदेश नाराजीनेच मानून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे राजेश क्षिरसागर यांनी माघार घेतली आहे. मात्र, कॉँग्रेसचा या ठिकाणी पुन्हा निवडून येण्याचा डाव शिवसेनेमुळेच उधळणार आणि कोल्हापूर उत्तरमध्ये मंगळवेढा घडणार अशी चर्चा सध्या सुरू आहे.Congress’s innings will be thwarted by Shiv Sena, another Mangalvedha will take place in Kolhapur North!

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे कोल्हापूर उत्तरची जागा रिकामी झाली आहे. त्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीचे मतदान १२ एप्रिल रोजी होणार असून १६ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे.काँग्रेसने या जागेवरुन दिवंगत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना रिंगणात उतरविले आहे.



भाजपने ही निवडणूक अतिशय ताकदीने लढवण्याचे ठरवत माजी नगरसेवक सत्यजीत कदम यांना मैदानात उतरविले आहे. काँग्रेसच्या जयश्री जाधव आणि भाजपचे सत्यजीत कदम यांच्यात दुरंगी लढत होत असली तरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पालकमंत्री सतेज पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. उमेदवार कुणीही असो, लढाई मात्र दोन पाटलांमध्ये होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच सत्यजीत कदम हे खासदार धनंजय महाडिक यांचे निकटवर्तीय असल्याने या निवडणुकीला सतेज पाटील- धनंजय महाडिक अशा संघर्षाचीही किनार आहे.

महाविकास आघाडीने त्यांच्या ठरलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणे ही जागा काँग्रेसला दिली. यावरूनदेखील चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली होती. शिवसेना लाचार आणि शिवसेनेचे कार्यकर्ते हवालदिल झाले आहेत. 2019 नंतर त जागांवर पोटनिवडणूक झाल्या. ज्या कोल्हापूरात 7 पैकी 5 वेळा शिवसेनेचा आमदार झाला आणि दोनदा काँग्रेसचा आमदार झाला. जर हीच जागा तुम्ही काँग्रेससाठी सोडत असला तर तुम्ही लाचार झालेले आहात, अस दिसून येत आहे. शिवसेनेचे कार्यकतेर्देखील आता हवालदिल झालेले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

२०१९ मध्ये चंद्रकांत जाधव यांच्या विजयात कॉंग्रेस नेते सतेज पाटील यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या पाठींब्यामुळेच जाधवांनी शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांना धूळ चारली होती. मागच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी क्षीरसागर पोटनिवडणुक लढविण्याच्या तयारीत होते. मात्र, पक्षनेतृत्वाने ही जागा कॉँग्रेसला सोडली. त्यानंतर राजेश क्षीरसागर नाराज झाले होते. काही दिवस ते आऊट ऑफ रिचही होते. त्यामुळे शिवसैनिकांची नाराजी कॉंग्रेसला भोवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यास सभेत दगडफेक झाल्याने वातावरण फिरल्याचेही काही जण बोलत आहे. मुक्तसैनिक वसाहत येथे सभेत अज्ञातांतकडून दगडफेक करण्यात आल्याचा दावा वाघ यांनी केला होता. यावेळी यावेळी वाघ यांनी ट्विट करत, ‘वा रे बहादुरांनो, समोर यायची हिंमत नाही म्हणून सभेत दगडे मारता का? ‘तुमची दहशत गुंड बलात्काऱ्यांना दाखवा. असल्या थेऱ्यांना घाबरणारी चित्रा वाघ नाही.

भाजपाचा नियोजनबध्दपणे जोरदार प्रचार सुरू असताना कॉँग्रेसला मुख्य चिंता ही शिवसेनेच्या नाराजीची आहे. माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आपली नाराजी उघडपणे जाहीर केली आहे. ज्यांनी सेनेचे ५ आमदार पाडले, त्यांच्यासाठी जागा सोडणं हे मनाला लागलं. निवडणूकीत पराभवानंतर डगमगलो नाही. मात्र उत्तर कोल्हापुरची जागा कॉंग्रेससाठी सोडणं याचं दु:ख वाटतंय अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती. महाविकास आघाडीच्या मेळाव्यालाही ते उपस्थित नव्हते. त्यामुळे कॉँग्रेसचा डाव शिवसेनाच उधळणार अशी चर्चा सुरू आहे.

Congress’s innings will be thwarted by Shiv Sena, another Mangalvedha will take place in Kolhapur North!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात