विशेष प्रतिनिधी
मुंबई : कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र ? काळा पैसा मिळवायचा, कारवाई झाली की बोंबलायचं’, केलेली पापं झाकण्यासाठी शक्ती प्रदर्शन करायचं. यातून जनतेने काय बोध घ्यावा? संजय राऊत यांचं लक्ष पक्षप्रमुख पदावर की, मुख्यमंत्री पदावर? अशी टीका केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केली.Narayan Rane criticizes Sanjay Raut for trying to get black money
केंद्रीय तपास यंत्रणांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केली. त्यानंतर बोलताना भाजपची पुढची पंचवीस वर्षे सत्ता येणार नाही. महाराष्ट्रात स्व:तचीच कबर भाजपने खोदली ती आता देशातही खोदणार आहेत असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. त्यावर नारायण राणे म्हणाले,
”कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?? काळा पैसा मिळवायचाय, अन् कारवाई झाली की बोंबलायचं.. त्यानंतर केलेली पापं झाकण्यासाठी शक्ती प्रदर्शन करायचं. यातून जनतेने काय बोध घ्यावा? संजय राऊत यांचं लक्ष पक्षप्रमुख पदावर की मुख्यमंत्री पदावर?”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App