फेसबुकच्या मार्क झुकेरबर्गच्या विश्वाेसर्हतेवर टाइमने उपस्थित केले प्रश्नचिन्ह

प्रतिनिधी

न्यूयॉर्क – जगातील प्रसिद्ध टाइम मासिकाने फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्गचे छायाचित्र मुखपुष्ठावर प्रकाशित केले असून ‘फेसबुक काढावे की ठेवावे’, असा सवाल वाचकांना केला आहे.TIME targets Mark Zukerburg

टाइमने म्हटले की, फेसबुकमुळे मुलांचे नुकसान होत आहे. फेसबुकचे लक्ष सुरक्षेऐवजी नफा कमावण्याकडे आहे. मासिकाच्या मुखपृष्ठावर झुकेरबर्ग यांचा फोटो असून त्यात ॲप डिलीट करण्याचे आयकॉन दाखवले आहे. हा ॲप डिलीट करायचा की ठेवायचा असा प्रश्नढ वाचकांना विचारला आहे. यासंदर्भात प्रकाशित झालेल्या लेखाचे लेखक बिली पेरिगो म्हणतात, की, फेसबुकची भविष्यातील वाटचाल कशीही असली तरी तेथे असंतोष धुमसत आहे.

फेसबुकच्या माजी कर्मचारी, माहिती तज्ञ फ्रान्सेस हॉगन यांच्याकडून फेसबुकबाबत खळबळजनक खुलासे केले जात आहेत. त्यांनी या आठवड्यात अमेरिकी सिनेटच्या ग्राहक संरक्षक समितीसमोर फेसबुक कंपनीकडून नागरिकांची सुरक्षा धोक्यात आणून कशा रीतीने नफा कमावला जात आहे, याच पाढा वाचला होता.

फेसबुक प्लॅटफॉर्मचा वापर हिंसाचार पसरविण्यासाठी केला जात आहे. या गोष्टी रोखण्यासाठी कंपनीकडून केले जाणारे उपाय हे खूपच त्रोटक आहेत, असा दावा केला.

TIME targets Mark Zukerburg

महत्त्वाच्या बातम्या