तालिबानचे अत्याचार सुरुच, अल्पसंख्य हजारा समुदायातील १३ जणांची हत्या

विशेष प्रतिनिधी

काबूल – सत्तेवर आलेल्या तालिबानने अल्पसंख्याकांवर अत्याचार सुरु केले असून काही दिवसांपूर्वीच त्यांनी हजारा समुदायातील १३ जणांची हत्या केल्याचा आरोप ॲम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थेने केला आहे.Taliban killed 13 peoples

हत्या केलेले बहुतांशी अफगाणिस्तामधील आधीच्या सरकारमधील सैनिक होते. मृतांमध्ये एका युवतीचाही समावेश होता. सर्व समुदायांना सामावून घेण्याचे आश्वाफसन तालिबानने बासनात गुंडाळले असल्याचा आरोप ॲम्नेस्टीने केला आहे.दरम्यान, अफगाणिस्तानमधील तालिबानी नेत्यांनी आज ब्रिटनच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. तालिबानने सत्ता हातात घेतल्यापासूनचही ही पहिलीच अधिकृत भेट आहे.

अफगाणिस्ताची अर्थव्यवस्था अडचणीत असून तिला सावरण्यासाठी तालिबानी नेते विविध देशांच्या अधिकाऱ्यांशी भेटीगाठी घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तालिबानने इराणच्याही शिष्टमंडळाशी व्यापाराबाबत चर्चा केली आहे.

Taliban killed 13 peoples

महत्त्वाच्या बातम्या