IBPS Clerk Recruitment : IBPS मार्फत क्लर्क पदासाठी सुवर्णसंधी , तब्बल 5830 जागांसाठी होणार पदभरती , असा करा अर्ज


इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS)ने क्लार्क पदांसाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा एकदा सुरु केल्याची घोषणा केली आहे.IBPS Clerk Recruitment: Golden Opportunity for Clerk Post through IBPS, Recruitment for 5830 Posts, Apply


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राष्ट्रीयकृत बँकांमध्ये लिपिक पदांसाठी सरकारी नोकरीसाठी इच्छुक असाल आणि बँक लिपिक भरती परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS)ने क्लार्क पदांसाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा एकदा सुरु केल्याची घोषणा केली आहे.

बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, यूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया यामध्ये एकूण 5858 लिपिक पदांसाठी भरती लवकर निघणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज सुरु होण्याची तारीख ७ ऑक्टोबर असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑक्टोबर आहे.यासाठीची अधिसूचना (IBPS Clerk Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. लिपिक या पदांसाठी ही भरती असणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी या ibpsonline.ibps.in लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे.

महत्वाची माहिती

१) एकूण जागा : ५८५८ (महाराष्ट्र ७९९)

२)पदाचे नाव : क्लार्क

३)शैक्षणिक पात्रता : a)इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
b)तसच उमेदवाराकडे वैध मार्क-शीट असणं आवश्यक आहेतसंच उमेदवारांनी गुणांची टक्केवारी जाहीर करणं आवश्यक आहे.
c)प्रमाणपत्र/डिप्लोमा/संगणक ऑपरेशन्स/भाषा/पदवी/संगणक याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे.

४)वयाची अट :a) उमेदवाराचे वय १ सप्टेंबर २०२१ रोजी किमान

b)२० वर्षे आणि जास्तीत जास्त २८ वर्षे असावे.

५)उमेदवाराचा जन्म २ सप्टेंबर १९९२ पूर्वीचा नसावा आणि १ सप्टेंबर २००० नंतरचा असावा.

६)परीक्षा फी : a)जनरल/ओबीसी करीत परीक्षा शुल्क ८५० रुपये भरावे लागेल.
b) SC/ST/PWD यांसाठी १७५ रुपये/-

६)नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

७)अर्ज पद्धती : ऑनलाईन

८)ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख : ७ ऑक्टोबर २०२१
९)अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ ऑक्टोबर २०२१

१०)पूर्व परीक्षा : नोव्हेंबर 2021

११)प्रीलिम्स प्रवेशपत्र : नोव्हेंबर/डिसेंबर 2021

१२)प्रीलिम्स परीक्षेची तारीख : डिसेंबर 2021

१३)अधिकृत वेबसाइट : ibpsonline.ibps.in

IBPS Clerk Recruitment: Golden Opportunity for Clerk Post through IBPS, Recruitment for 5830 Posts, Apply

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”