नाहीतर संपूर्ण आशिया खंडाला याचे वाईट परिणाम भोगावे लागतील – तैवानच्या राष्ट्रपती साई इंग वेन


विशेष प्रतिनिधी

दिल्ली : चीन आणि तैवान या दोन राष्ट्रांमधील संबंध दिवसेंदिवस बिघडत चालले आहेत ल. 1 ऑक्टोबर रोजी चीनने आपला राष्ट्रीय दिवस साजरा केला. यादिवशी आपल्या सैन्याचे शक्तिप्रदर्शन करताना चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने तैवानच्या वायू रक्षा सुरक्षा क्षेत्रातील ३८ विमानांना उधळून लावले हाेते. यावर आता तैवानच्या राष्ट्रपती साई इंग वेन यांचे मत आता समोर आले आहे.

Taiwan warns over China’s attack – if captured, there will be destruction in whole Asia

चीनला धमकी देताना त्या म्हणाल्या आहेत की, जर चीनने तैवानवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या शक्तिप्रदर्शनाने तैवानला दाबण्याचा प्रयत्न केला तर याचे परिणाम गंभीर आणि विनाशकारी असतील. आणि हे परिणाम संपूर्ण आशिया खंडातील देशांना भोगावे लागतील. सोबत त्यांनी हेदेखील म्हटले की, आम्हाला युद्ध करण्याची कोणतीही इच्छा नाहीये पण आमच्या देशाला सुरक्षित करण्यासाठी जे काही करावे लागेल ते आम्ही नक्कीच करू.


RSS Chief on Mob Lynching : “हे” हिंदुत्व नाही, पण मॉब लिंचिंगच्या अनेक केसेसही खोट्या – डॉ. मोहन भागवत


या दोन्ही देशांमधला नेमका मुद्दा आहे तरी काय ?

तैवान स्वत:ला स्वघोषित लोकशाही देश म्हणून पाहतो. तर चीनचे असे म्हणणे आहे तैवान हा चीनचाच भाग आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी आपल्या एका स्टेटमेंटमध्ये सांगितले होते की, चीन काहीही करून तैवानवर पूर्णपणे विजय मिळवणारच. चीनपासून 180 किलोमीटर दूर फक्त इतक्याच अंतरावर तैवान हा देश आहे. तैवानची भाषा आणि तैवानचे पूर्वज हे चिनचेच आहेत. पण त्यांची राजकीय व्यवस्था पूर्णपणे वेगळी आहे.

या सर्व घडामोडी होत असतानाही ही एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की, चीन सारख्या महासत्ता असलेल्या देश आजपर्यंत तैवानवर पूर्णपणे कब्जा करू शकलेले नाहीये. पण चीन दरवेळी आपलं शक्तिप्रदर्शन करण्यास अजिबात मागे हटत नाही.

Taiwan warns over China’s attack – if captured, there will be destruction in whole Asia

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण