Sri Lanka Crisis : श्रीलंकेत 4 महिन्यांनंतर चौथ्यांदा आणीबाणी; उद्या राष्ट्रपतींची निवड

वृत्तसंस्था

कोलंबो : श्रीलंकेत अवघ्या 4 महिन्यांत चौथ्यांदा आणीबाणी लागू करण्यात आली आहे. काळजीवाहू राष्ट्रपती रनिल विक्रमसिंघे यांनी आणीबाणी घोषित केली. 20 जुलै रोजी राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक होणार आहे. त्याच्या तोंडावरच हा निर्णय घेण्यात आला आहे.Sri Lanka Crisis Fourth Emergency in Sri Lanka after 4 months; Presidential election tomorrow

विक्रमसिंघे यांच्याकडून हा आदेश देण्यात आला. देशात आर्थिक संकट आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था व जीवनावश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठ्यासाठी 18 जुलैपासून आणीबाणी लागू करत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.श्रीलंकेत पहिल्यांदा राजपक्षे सरकारने 1 एप्रिलला आणीबाणी लागू केली होती. 5 एप्रिलला मात्र आणीबाणी हटवण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा 6 मे पासून 20 मेपर्यंत लागू केली.

मतभेद विसरून सरकार स्थापन करा

विक्रमसिंघे यांनी राजकीय पक्षांना मतभेद विसरून सर्वांनी मिळून सरकार स्थापन करण्याचे आवाहन केले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीश सकारात्मक चर्चा होईल, असा विश्वास व्यक्त केला.

Sri Lanka Crisis Fourth Emergency in Sri Lanka after 4 months; Presidential election tomorrow

महत्वाच्या बातम्या