द फोकस एक्सप्लेनर : लोकसभेतही सेनेच्या संसदीय पक्षावर एकनाथ शिंदेंचे वर्चस्व, 19 पैकी 12 खासदारांनी दिले पत्र, पुढे काय? वाचा सविस्तर..


आधी 40 आमदार आणि आता 19 पैकी 12 खासदार हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय वजन वाढत असून ते शिवसेनेचे सर्वेसर्वा होण्याची चिन्हे दिसत आहेत. मुख्यमंत्रिपदाच्या शक्तीमुळे उद्धव ठाकरेंकडे असलेली उरलीसुरली शिवसेनाही शिंदे आपल्याकडे वळवण्याची चर्चा सुरू झाली आहे.The Focus Explainer Eknath Shinde dominates Sena parliamentary party in Lok Sabha too, 12 out of 19 MPs give letter, what next? Read in detail..

मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 12 खासदारांसह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन राहुल शेवाळे यांना गटनेते करण्याबाबत पत्र दिले. त्यानंतर काही तासांतच बिर्ला यांनी त्यांच्या नावाला मंजुरी दिली. शिंदे म्हणाले, भावना गवळी याच मुख्य प्रतोद असतील. त्यांचाच व्हीप खासदारांना लागू असेल. याआधी विनायक राऊत यांनी आपणच गटनेता असल्याचे पत्र लोकसभा अध्यक्षांकडे दिले होते. मात्र, लोकसभा अध्यक्षांनी रात्री उशिरा शेवाळेंची नियुक्ती केली.



राहुल शेवाळेंचा गौप्यस्फोट

राहुल शेवाळे म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत युतीबाबत जून 2021 मध्ये एक तास चर्चा झाली होती. फडणवीस यांच्याशीही ठाकरेंची चर्चा झाली होती. तसेच उद्धव ठाकरे यांनी आम्हाला भाजपसोबत युती करायची असल्याचे सांगितले. मात्र, संजय राऊत यांनी खोडा घातल्याने युती होऊ शकली नाही. सेनेने केंद्रातून मंत्रिपद सोडले. मात्र, एनडीएतून बाहेर पडण्याबाबत कुठलेही पत्र दिले नाही. त्यामुळे आम्ही आजही एनडीएमध्ये आहोत, असा दावाही शेवाळेंनी केला. 56 आमदार, 19 खासदार आणि मुंबई व ठाणे महापालिका तसेच कोकण व मराठवाड्यातील कार्यकर्ते ही शिवसेनेची ताकद मानली जाते. मात्र, यातील 40 आमदार, 12 खासदार आणि मुंबई, ठाणे महापालिकेचे ७० टक्के नगरसेवक आज शिंदे गटात आहेत. कोकण व मराठवाड्यातील शिवसेनेच्या बहुतांश लोकप्रतिनिधींनी या गटाला पाठिंबा दिला असून बंडखोरांचा गट प्रवाह बनला आहे. दुसरीकडे मंगळवारी युवा सेनेच्या राज्य सचिव पदावरून वरुण सरदेसाई यांची उचलबांगडी करून शिंदे गटाने किरण साळी यांची नियुक्ती केली.

कोण आहेत राहुल शेवाळे?

2014 मध्ये मोदी लाटेत राहुल शेवाळे पहिल्यांदा दक्षिण मध्य मुंबई या अनुसूचित जातीसाठी आरक्षित मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी काँग्रेसचे एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला. 2019 मध्ये शेवाळेंनी पुन्हा लोकसभेची निवडणूक जिंकली. ते प्रथम अणुशक्तिनगर येथून मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2004 मध्ये त्यांनी तुर्भे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, पण त्यांचा पराभव झाला. 2010 ते 2014 अशी सलग चार वर्षे मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समितीच्या अध्यक्षपदी राहण्याचा मान शेवाळे यांनी मिळवला. शेवाळे यांच्याविरोधात एका महिलेने लैंगिक अत्याचाराची पोलिसांकडे तक्रार दिली आहे. शेवाळे हे भाजपमध्ये जाण्याच्या मध्यंतरी चर्चा होत्या.

युती तुटण्यास शिवसेना जबाबदार नाही : राऊत

शिंदे आणि शेवाळेंच्या पत्रकार परिषदेनंतर सेना खासदार संजय राऊत म्हणाले की, युती आम्हालाही हवी होती. भाजपने आमच्यावर महाविकास आघाडी लादली आहे. निवडणुकीच्या मैदानात शिवसेना उत्तर देईल, असेही राऊत म्हणाले.

शिवसेना, शिंदे गटाच्या याचिकांवर आज सर्वोच्च सुनावणी

शिवसेना आणि शिंदे गटातील वादावर 20 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यात शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र करावे, राज्यपालांची भूमिका, सरकारची वैधता व गटनेतेपदाबाबतही सेनेची याचिका आहे. शिंदे गटानेही याचिका दाखल केलीय. तसेच ओबीसी आरक्षणाबाबतही आजी सुनावणी आहे.

पुढे काय?

शिवसेना म्हणजे आम्हीच आहोत, आमच्याकडे लोकप्रतिनिधींचे बहुमत आहे, असा बंडखोरांचा दावा आहे. मुंबई व ठाणे या महापालिका शिवसेनेचे गंडस्थळ मानल्या जातात. राज्यात सेना वाढण्यात या महापालिकांतील सत्तांनी रसद पुरवली आहे. आता या दोन्ही महापालिकांतील नगरसेवक शिंदे गटात सामील होत आहेत. मुंबई, ठाणे आणि इतर महापालिकांतील सत्ता हस्तगत करून ठाकरेंचे बळ कमी करण्याची रणनीती शिंदे गटाने आखली आहे. शिंदे यांची आता जिल्हाप्रमुख, ग्रामीण भागातील कार्यकर्ते, पदाधिकारी आपल्याकडे वळवण्याची रणनीती आहे. शिंदे गटाकडेच ओढा वाढत असल्याने कार्यकर्त्यांना आपली कामे करून घेण्यासाठी आता शिंदेंशिवाय पर्याय उरला नाही. त्यामुळे आता अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदेंकडे जातील.

शिंदे गटात हे 12 खासदार

डॉ. श्रीकांत शिंदे, धैर्यशील माने, संजय मंडलिक, राहुल शेवाळे, श्रीरंग बारणे, हेमंत गोडसे, राजेंद्र गावित, भावना गवळी, हेमंत पाटील, कृपाल तुमाने, प्रतापराव जाधव, सदाशिव लोखंडे याशिवाय आणखी काही खासदार शिंदे गटाकडे जाऊ शकतात.

उद्धव ठाकरेंकडे हे 6 खासदार

विनायक राऊत, अरविंद सावंत, राजन विचारे, गजानन कीर्तिकर, बंडू जाधव, ओमराजे निंबाळकर

The Focus Explainer Eknath Shinde dominates Sena parliamentary party in Lok Sabha too, 12 out of 19 MPs give letter, what next? Read in detail..

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात