श्रीलंकेत सरकार समर्थक, विरोधकांत हिंसक संघर्ष, पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचा राजीनामा

आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेत राजधानी कोलंबोसह अनेक भागांत सरकार समर्थक व विरोधकांत हिंसक संघर्ष उफाळला आहे. पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी अखेर सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. In Sri Lanka, violent clashes between pro-government and opposition, the resignation of Prime Minister Mahinda Rajapaksa


विशेष प्रतिनिधी

कोलंबो : आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेत राजधानी कोलंबोसह अनेक भागांत सरकार समर्थक व विरोधकांत हिंसक संघर्ष उफाळला आहे. पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी अखेर सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

हिंसक जमावाच्या आंदोलनामुळे सत्ताधारी पक्षाचे खासदार अमरकीर्ति अथुकोरला यांचा मृत्यू झाला आहे. जमावाने माजी मंत्री जॉन्स्टन फर्नांडो यांच्या माउंट लॅव्हिनिया भागातील आलिशान घर पेटवून दिले आहे. त्यात त्यांचे कुटूंब थोडक्यात बचावलेत. हिंसक जमावाने अन्य एक खासदार सनथ निशांथा यांच्या घरावरही जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला आहे.

गेल्या आठवड्यात प्रमुख विरोधी पक्षनेते सिरिसेना यांनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांची भेट घेतली होती. त्यात पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता लंकेत अंतरिम सरकार स्थापन होईल. पण, तत्पूर्वी देशात शांतता प्रस्थापित करावी लागेल. सरकारमध्ये सध्या राजपक्षे कुटूंबाचा दबदबा आहे. हे घराणे सरकारमध्ये विरोधकांचा समावेश करुन आपल्या अपयशाचे खापर त्यांच्या डोक्यावर फोडण्याच्या प्रयत्नांत आहे. याऊलट देश वाचवण्यासाठी विरोधकही सरकार व विशेषत: राष्ट्रपती गोटाबाया यांची साथ देण्यास तयार असल्यामुळे लंकेत लवकरच अंतरिम सरकार दिसून येईल.

श्रीलंकेच्या अनेक भागांत पोलिस व निदर्शकांत हिंसक चकमकी सुरू आहेत. त्यातच महिंदा यांच्या राजीनाम्यामुळे स्थिती अधिकच बिकट बनली आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती तथा महिंदा यांचे मोठे बंधू गोटाबाया राजपक्षे यांची महिंदा यांचा राजीनामा घेण्याची इच्छा नव्हती. पण, विरोधकांच्या मागणीपुढे त्यांना झुकावे लागले. आता राजपक्षे यांचे समर्थक रस्त्यावर उतरलेत.

देशावरील आर्थिक संकटाविरोधात सर्वसामान्य नागरिकांनी शुक्रवारी नॅश्नल असेम्ब्लीपुढे हिंसक निदर्शने केली. यामुळे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षेंना देशात पुन्हा आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली. यापूर्वी 1 एप्रिल रोजी आणीबाणी घोषित करण्यात आली होती. ती 6 एप्रिल रोजी रद्द करण्यात आली. त्यानंतर आता पुन्हा ती लागू करण्यात आली आहे.

श्रीलंका आपल्या (1948) स्थापनेपासून प्रथमच एवढ्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. लंकेची परदेशी गंगाजळी जवळपास संपुष्टात आली आहे. यामुळे अत्यावश्यक वस्तुंची आयात करताना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. बांग्लादेशाने लंकेला दिलेल्या 20 कोटी डॉलर्सचे कर्ज फेडण्याची मुदत वर्षभराने वाढवली आहे. बांग्लादेशाने गेल्या वर्षी मे महिन्यात मुद्रा विनिमय कराराच्या माध्यमातून श्रीलंकेला 20 कोटी डॉलर्सचे कर्ज दिले होते. हे कर्ज लंकेला 3 महिन्यांत फेडावयाचे होते. पण, त्यानंतर लंकेत गंभीर आर्थिक संकट उद्भवले. यामुळे बांग्लादेशाने कर्ज फेडण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

In Sri Lanka, violent clashes between pro-government and opposition, the resignation of Prime Minister Mahinda Rajapaksa

महत्वाच्या बातम्या