पाकिस्तानी ध्वजात गुंडाळला फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांचा मृतदेह


विशेष प्रतिनिधी

श्रीनगर : काश्मीरमधील फुटीरतावादी नेता सय्यद अली शाह गिलानी यांचा मृतदेह पाकिस्तानी ध्वजात गुंडाळलेला व्हिडीओ समोर आला आहे. प्रत्यक्ष श्रीनगरमध्ये हा राष्ट्र्रद्रोही प्रकार घडला आहे. पोलीसांनी गिलानी यांचा मृतदेह ताब्यात घेण्यापूर्वी एका खोलीमध्ये गिलानी यांचा मृतदेह पाकिस्तानी ध्वजात गुंडाळलेला दिसला. पोलीसांनी याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.Separatist leader Syed Ali Shah Gilani’s body wrapped in Pakistani flag

९२ वर्षीय गिलानी यांचा बुधवारी संध्याकाळी मृत्यू झाला. आयुष्यभर पाकिस्तान समर्थक फुटीरतावादी अशी त्यांची ओळख राहिली आहे. त्यांच्या मृत्यूनंतर तणाव निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे काश्मीरमध्ये इंटरनेट बंदी करण्यात आली होती. ब्रॉडबँड इंटरनेट आणि फोन सेवा पूर्ववत झाल्यानंतर हे व्हिडिओ समोर आले. मोबाईल इंटरनेट सेवा मात्र बंद आहे.या व्हिडीओमध्ये अनेक महिला गिलानी यांच्या मृतदेहाभोवती दिसत आहेत. त्यांचे पार्थिव पाकिस्तानी झेंड्यात गुंडाळलेले आहे. या खोलीत गोंधळ आणि घोषणाबाजी सुरू आहे. सशस्त्र पोलीसही याठिकाणी दिसून येत असून महिला त्यांना प्रतिकार करत आहेत.

गुरूवारी गिलानी यांचे दफन करण्यात आले. त्यांच्या कुटुंबाने आरोप केला आहे की मृतदेह पोलिसांनी जबरदस्तीने काढून घेतला. त्यांना शेवटच्या क्रियाकर्मासाठी परवानगी देण्यात आली नव्हती. पोलिसांनी जबरदस्तीने मृतदेह ताब्यात घेतला आणि दरवाजे तोडून महिलांशी गैरवर्तन केले.

जम्मू-काश्मीर पोलिस महासंचालक दिलबाग सिंह म्हणाले, या प्रकरणाशी संबंधित सर्वांवर देशविरोधक्ष कारवाया केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिलानी यांच्या घरी फुटीरतावाद्यांनी वरिष्ठ पोलीस अधीक्षक आणि इतर पोलिसांसोबत गैरवर्तन केले. देशविरोधी घोषणाबाजी केली. सोशल मीडिया आणि फोन कॉलचा वापर करून लोकांना भडकवण्याचा प्रयत्न झाला.

गिलानी यांच्या घरात त्यांचे कुटुंब आणि कार्यकर्त्यांकडून अशा अनैतिक वर्तनाची आम्ही कधीच अपेक्षा केली नव्हती. पोलीस त्यांच्या नियमित संपर्कात होते. गेल्या आठवड्यात जेव्हा गिलानी भेटीला आले तेव्हा आमच्या एका अधिकाºयाला पुस्तक भेट म्हणून दिले होते.

पोलिसांनी सांगितले की गिलानी यांचे काही नातेवाईक त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. श्रीनगर विमानतळ रस्त्यावरील हैदरपोरा येथील त्यांच्या निवासस्थानाजवळ दफ करण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण काश्मीरमध्ये निर्बंध लादण्यात आले आहेत. सर्व दुकाने बंद आहेत आणि सार्वजनिक वाहतूक रस्त्यावर आहे. शुक्रवारी कोणत्याही मोठ्या मशिदी आणि देवस्थानांमध्ये कोणत्याही सामुदायिक प्रार्थनेला परवानगी नव्हती.

Separatist leader Syed Ali Shah Gilani’s body wrapped in Pakistani flag

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय