इराकचे सर्वोच्च शिया धर्मगुरु अल हकीम यांचे निधन


विशेष प्रतिनिधी

बगदाद – इराकमधील जगप्रसिद्ध शिया धर्मगुरु ग्रँड अयातुल्ला सय्यद महंमद सईद अल-हकीम (वय ८५) यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. नजफ शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. Al-Hakim, Iraq’s top Shia cleric, has died

अल हकीम यांना मुस्लिमांमधील शिया पंथातील अयातुल्ला अल -उझ्मा ही सर्वोच्च धार्मिक पदवी प्राप्त होती. इराकचे सध्याचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला अल सिस्तानी यांच्यानंतर त्यांच्या जागेवर अल हकीम यांच्याच नावाची चर्चा होती.

अल हकीम हे इराकमधील अत्यंत प्रतिष्ठित घराण्यातील होते. सद्दाम हुसेनच्या राजवटीत त्यांना स्थानबद्धतेत ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर झालेल्या बाँब हल्ल्यातूनही ते थोडक्यात बचावले होते.
इराकचे अध्यक्ष आणि पंतप्रधानांनी अल हकीम यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

Al-Hakim, Iraq’s top Shia cleric, has died

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात