Battle Of Panjshir : कुरापतखोर पाकिस्तान पुन्हा तालिबानच्या मदतीला, पंजशीरमधील बंडखोरांना चिरडण्यासाठी सैन्य कुमक पाठवली, तालिबान्यांकडून ‘वाटा’ मिळण्याची अपेक्षा!

According To Defense Experts, Pakistani PM Imran Khan And Army Chief General Qamar Javed Bajwa Have Sent Some Units Of Their Army To Panjshir

Battle Of Panjshir : अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तालिबानसोबतच ‘शेजारी’ देश पाकिस्तानला आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. संरक्षण तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी त्यांच्या सैन्याच्या काही तुकड्या पंजशीरला पाठवल्या आहेत. तालिबानने बाजवांपुढे एक अट ठेवली होती की ‘पंजशीर’ जिंकल्यानंतर त्यांना तेथून अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांचे शिर आणावे लागेल. Battle Of Panjshir According To Defense Experts, Pakistani PM Imran Khan And Army Chief General Qamar Javed Bajwa Have Sent Some Units Of Their Army To Panjshir


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तालिबानसोबतच ‘शेजारी’ देश पाकिस्तानला आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. संरक्षण तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी त्यांच्या सैन्याच्या काही तुकड्या पंजशीरला पाठवल्या आहेत. तालिबानने बाजवांपुढे एक अट ठेवली होती की ‘पंजशीर’ जिंकल्यानंतर त्यांना तेथून अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांचे शिर आणावे लागेल.

पाकिस्तानकडून तालिबान्यांना पुरेपूर मदत

याव्यतिरिक्त, शेजारी देशाने तालिबानला आठवण करून दिली आहे की त्यांनी अफगाणिस्तानातून आलेल्या 30 लाखांहून अधिक निर्वासितांना स्थायिक केले आहे. यासह पाकिस्तानी कारागृहात बंद असलेल्या सुमारे 11 हजार तालिबान्यांची सुटका करण्यात आली आहे. त्यांना सुरक्षितपणे अफगाणिस्तानला पाठवण्यात आले. यामुळे आता पाकिस्तान ‘महाशक्तींचे कब्रस्तान’ अर्थात अफगाणिस्तानमध्ये आपला वाटा मागत आहे. दहशतवादी गट अल कायदाने अफगाणिस्तानला “महासत्तांचे कब्रस्तान” आणि “इस्लामचा अजिंक्य किल्ला” असे संबोधले आहे. ते म्हणाले की, हेच आता इस्लामिक जिहादचे केंद्र असेल.

इम्रान खान यांना तालिबान्यांकडून लाभाची अपेक्षा

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा तालिबानबद्दल खूप चिंतित आहेत. त्यांच्या चिंतेचे कारण तेथे सरकार कधी स्थापन होईल किंवा कोणाला कोणते पद मिळेल, हे अजिबात नाही. त्यांचा फोकस तालिबानी सरकारमधील स्वतःच्या फायद्यांवर आहे. आपल्याला काय-काय मिळू शकते, याच्याच शोधात पाकिस्तान आहे. दुसरे म्हणजे, शेजारी देशही भारताला तालिबानपर्यंत पोहोचू नये यासाठी प्रयत्न करत आहे. एवढेच नाही तर पाकिस्तानला असेही वाटते की, महासत्तांव्यतिरिक्त इतर देशांनीही संपर्क साधण्यापूर्वी अफगाणिस्तानशी चर्चा करावी.

काय म्हणाले संरक्षण तज्ज्ञ?

सेवानिवृत्त मेजर जनरल आणि संरक्षण तज्ज्ञ जीडी बक्षी यांच्या मते, पाकिस्तानने सर्व काही पणाला लावले आहे. सध्या पंजशीरमध्ये उपस्थित असलेल्या अमरुल्ला सालेह यांनी तालिबानला कडवी झुंज दिली आहे. पाकिस्तानने हजारो दहशतवाद्यांना अफगाणिस्तानात पाठवले आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अफगाणिस्तानात पाकने आपल्या अधिकाऱ्यांसह सैन्याच्या अनेक तुकड्या पाठवल्या आहेत.

तालिबान आणि पंजशीर सेनानींमध्ये अनेक दिवसांपासून भीषण लढाई सुरू आहे. काही वेळा तालिबानने लढाई जिंकल्याच्या बातम्याही आल्या होत्या. माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह हे पंजशीर सोडून कुठेतरी गेले आहेत. तथापि, काही तासांनंतर, माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी आपला व्हिडिओ प्रसिद्ध केला, ते म्हणाले की, ते पंजशीरमध्येच आहेत. येथील परिस्थिती फारशी चांगली नाही.

संरक्षण तज्ज्ञ जीडी बक्षी यांच्या मते, पाकिस्तानी आयएसआय प्रमुख स्वतः काबूलमध्ये आहेत. त्याचे अनेक सहयोगी पंजशीरमध्ये तालिबानच्या बाजूने लढत आहेत. पंजशीरमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या दोन अधिकाऱ्यांसह सुमारे 10 सैनिकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. खरं तर, पाकिस्तान या प्रकरणात अधिक क्रियाशीलता दाखवत आहे जेणेकरून तालिबानसमोर वाटा मागण्याची आपली मागणी ते प्रभावीपणे मांडू शकतील. दुसरे म्हणजे, त्याला तालिबानची अटदेखील पूर्ण करावी लागेल. म्हणजेच माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांचे शिर आणून द्यावे लागेल. तरच तालिबान सहकार्याच्या स्वरूपात पाकिस्तानला काही देईल. येथे पंतप्रधान इम्रान खान आणि लष्करप्रमुख बाजवा या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Battle Of Panjshir According To Defense Experts, Pakistani PM Imran Khan And Army Chief General Qamar Javed Bajwa Have Sent Some Units Of Their Army To Panjshir

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण