Jharkhand Room Allotted For Namaz In The Assembly BJP Leader Said Give Places For Hanuman Chalisa Too

झारखंड विधानसभेत नमाज अदा करण्यासाठी रूमची सोय, भाजप नेते म्हणाले – हनुमान चालिसासाठीही मिळावी जागा

Jharkhand Room Allotted For Namaz : झारखंड विधानसभा संकुलात नमाज अदा करण्यासाठी खोली वाटपाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली आहे. आता माजी स्पीकर आणि भाजप नेते सीपी सिंह यांची प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले की, हिंदूंनाही विधानसभा परिसरात हनुमान मंदिर बांधण्याची परवानगी दिली जावी. Jharkhand Room Allotted For Namaz In The Assembly BJP Leader Said Give Places For Hanuman Chalisa Too


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : झारखंड विधानसभा संकुलात नमाज अदा करण्यासाठी खोली वाटपाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली आहे. आता माजी स्पीकर आणि भाजप नेते सीपी सिंह यांची प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणाले की, हिंदूंनाही विधानसभा परिसरात हनुमान मंदिर बांधण्याची परवानगी दिली जावी.

यापूर्वी भाजप नेते विरंची नारायण यांचे वक्तव्यही समोर आले होते. त्यांनी मागणी केली होती की, नमाज अदा करण्यासाठी खोली दिली, तशी हिंदूंनाही हनुमान चालिसा वाचण्यासाठी एक खोली दिली पाहिजे.

2 सप्टेंबर नमाजसाठी दिली खोली

2 सप्टेंबर रोजी झारखंड विधानसभेत नमाज अदा करण्यासाठी एक खोली देण्यात आली होती. येथील TW 348 क्रमांकाची खोली नमाजसाठी देण्यात आली. यानंतरच या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

जागा द्या, आम्ही आमच्या पैशातून मंदिर बांधू

भाजप नेते सीपी सिंह यांनी एएनआयला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले की, आम्हाला नमाजबाबत कोणतीही अडचण नाही, परंतु त्यांनी विधानसभा परिसरात हनुमान मंदिरासाठीही जागा द्यावी. जर स्पीकरने परवानगी दिली आणि जागा दिली, तर आम्ही स्वतःच्या पैशाने मंदिर उभारू.

Jharkhand Room Allotted For Namaz In The Assembly BJP Leader Said Give Places For Hanuman Chalisa Too

महत्त्वाच्या बातम्या