करुणा शर्मा यांचे फेसबुक लाईव्ह आणि धनंजय मुंडे यांची बातमी प्रसिध्द होऊ नये यासाठी पळापळ


विशेष प्रतिनिधी

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या करुणा शर्मा यांनी फेसबुक लाईव्ह करत पाच सप्टेंबरला परळी येथे पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले. याची बातमी छापून येऊ नये यासाठी धनंजय मुंडे यांनी पळापळ करून सर्व प्रसारमाध्यमांना पत्र पाठविले आहे. तसेच करूणा शर्मांना नोटीस पाठविली आहे.Karuna Sharma’s Facebook Live and Dhananjay Munde’s efforts to not published news

करुणा शर्मा यांनी जानेवारी महिन्यात धनंजय मुंडे यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. ज्यानंतर धनंजय मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली होती त्यामध्ये करूणा शर्मा यांच्यासोबत असलेले त्यांचे संबंध त्यांनी मान्य केले होते. त्यांच्यापासून झालेल्या मुलांना आपण आपलं नाव दिल्याचंही जाहीर केले होते.



त्यानंतर आता करुणा शर्मा यांनी फेसबुक लाईव्ह केले असून परळी येथून पत्रकार परिषद घेत विविध कॉल रेकॉर्ड आणि इतर साहित्य प्रसिद्धीस देणार असल्याचे जाहीर केले. त्या म्हणाल्या होत्या की, बीड मधील जनतेचा आशीर्वाद आणि त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद करून समस्या जाणून अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी पाहणी करून गावकऱ्यांशी संवाद साधणार आहे. रविवारी 12 वाजता परळी वैजनाथ मधील लोकांसमोर काही गोष्टींचा खुलासाही करणार आहे.

या लाईव्ह दरम्यान माझ्यावर आईवर, बहिणीवर, मुलांवर झालेल्या अत्याचाराबद्दल तसेच मुलांना कशाप्रकारे धमकीचे फोन येत आहेत याबाबत देखील मी खुलासा करणार आहे. तरी सर्व पत्रकार बांधवांनी रविवारी 12 वाजता परळी वैजनाथ मंदिर मध्ये उपस्थित राहावे

परंतु 28 जानेवारी 2021 झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने हे प्रकरण न्यायप्रविष्ट व संवेदनशील असल्याने धनंजय मुंडे किंवा करुणा शर्मा यांच्याबद्दलचे कोणतेही खासगी साहित्य प्रसिद्ध किंवा प्रकाशित करण्यात निर्बंध घातलेले आहेत. असं असूनही करुणा शर्मा यांनी जाहीर केलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी असे कोणतेही साहित्य प्रसिद्ध किंवा प्रकाशित करण्याचा प्रयत्न केल्यास तो उच्च न्यायालयाचा अवमान ठरणार आहे.

न्यायिक प्रक्रियेनुसार कोणत्याही प्रसिद्धी माध्यमाने ते साहित्य प्रसिद्ध करणे देखील उच्च न्यायालयाचा अवमानच ठरतो, त्यामुळे अशा कोणत्याही साहित्याला प्रसिद्धी माध्यमांनी प्रकाशित किंवा प्रसिद्ध करू नये असे पत्र धनंजय मुंडे यांच्या या प्रकरणातील वकील सुषमा सिंह यांनी सर्व प्रसारमाध्यमांना पाठवले आहे.

या प्रकरणात सातत्याने विविध प्रकारचे आरोप करून बदनामी करत मोठ्या स्वरूपात ब्लॅकमेलिंग केली जात असल्याचे यापूर्वीच धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलेले आहे. सध्या हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे.

त्यामुळे अशा स्वरूपातील कोणतेही साहित्य प्रसिद्ध करणे हे त्या प्रकरणाच्या निकालावर देखील परिणामकारक ठरू शकते. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचा अवमान केला जाऊ नये असे अ‍ॅड. सुषमा सिंह यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

Karuna Sharma’s Facebook Live and Dhananjay Munde’s efforts to not published news

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात