सर्वसमावेशक सरकारला आकार देण्यात तालिबानला अद्यापही यश नाहीच


विशेष प्रतिनिधी

काबूल – अफगाणिस्तानचा ताबा मिळून दोन आठवडे उलटून गेले तरी तालिबानला येथे अद्याप सरकार स्थापन करता आलेले नाही. सरकार स्थापनेची घोषणा लांबणीवर पडत ती आता पुढील आठवड्यात करणार असल्याचे तालिबानचा प्रवक्ता झबिबउल्ला मुजाहिद याने जाहीर केले. Taliban failed to form govt.

अफगाणमधून अमेरिकेच्या फौजा माघारी परतल्यानंतर तालिबानने देशाचा सारा ताबा घेतला. मात्र तरीही जगाने तालिबानला अजूनही मनापालून स्वीकारलेले नाही. त्यामुळे सरकार स्थापण्यात तालिबानाला मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. 

आंतरराष्ट्रीय समुदायाला मान्य असलेल्या सर्वसमावेशक सरकारला आकार देण्यात तालिबानला अद्याप यश आलेले नाही. तालिबानतर्फे खलिल हक्कानी हा म्होरक्या विविध गटांशी चर्चा करत आहे. ‘वास्तविक आम्ही आमचे सरकार स्थापन करू शकतो. मात्र, आम्हाला सर्वांचा समावेश असलेले सरकार हवे आहे. आमच्या एकट्याचे सरकार जगाला मान्य होणार नाही,’ असे मुजाहिद याने पत्रकारांना सांगितले.

Taliban failed to form govt.

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर